Electricity Supply Issue: विजेसाठी शेतकऱ्यांचे उद्यापासून बेमुदत उपोषण; आश्वासनानंतरही कार्यवाही होत नसल्याचा ग्रामस्थांकडून आरोप
Farmers Hunger Strike for Electricity: धामणी परिसरातील उपसा सिंचन योजनांना वीज कनेक्शन देण्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याचा आरोप करत माजी सरपंच सागर जाधव यांच्यासह दहा शेतकरी सोमवारपासून (ता. २२) धामणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहेत.