Soybean Damage: शेंदोळा बुजरूक (ता. तिवसा) येथील शेतकऱ्यांचे सोयाबीन पिक सततच्या पावसामुळे रोगग्रस्त व खराब झाले आहे. सर्वेक्षण व पंचनामे न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी घटस्थापनेच्या दिवशी थेट खराब पिकावर रोटावेटर चालवण्याचा प्रयोग करण्याची योजना आखली असून महसूल आणि कृषी विभागाला त्याची निमंत्रण पत्रिका दिली आहे.