
Solapur News : उत्तर सोलापूर ः उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावात रानडुक्करांनी उच्छाद मांडला असून, शेतीमालाचे फार मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. रानडुक्करांच्या उपद्रवाला कंटाळून कित्येक शेतकरी शेती सोडून रोजगार शोधत आहेत. वनविभागाने यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
शासनाकडील आकडेवारी नुसार या परिसरात रानडुक्करांच्या संख्येत बेसुमार वाढ झाली आहे. अभयारण्याच्या क्षेत्रात रानडुक्करांना खाण्यासाठी चारा नाही. त्यामुळे ही रानडुक्करे लगतच्या गावातील शेतीपिकावर हाल्ला करत आहेत. रानडुक्करांच्या उपद्रवामुळे मका व भुईमूग ही पिके या परिसरातून नामशेष झाली आहेत. रानडुक्करांचा सर्वात जास्त फटका मार्डी, नान्नज, कोंडी, वडाळा, कांरबा, अकोलेकाटी या भागाला बसत आहे.
प्रामुख्याने या परिसरातील शेतकरी अल्पभूधारक असून भाजीपाला उत्पादक आहेत. मात्र गेल्या काही वर्षा पासून त्यांना शेती सोडून मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे. कारण त्यांनी पिकविलेल्या पालेभाज्यावर रानडुक्करे रात्रीत ताव मारत आहेत.भाजीपाल्या सोबतच सध्या ज्वारी पिकालाही रानडुक्करांचा फार उपद्रव होत आहे. हुरड्यात आलेले ज्वारीचे फड रानडुक्करांचे कळप एका रात्रीत आडवा करत आहेत.
रानडुक्करे लहान लावले रोपटे काढून टाकतात, त्याच बरोबर फळाच्या मुळ्या उकरतात यामुळे कित्येक वेळा फळांची झाडे मरून जातात. या सह रानडुक्करांचे कळप शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनाच्या नळ्या यासह इतर शेतीसाहित्याची प्रचंड नासधूस करत आहेत.
वन्यजीव संवर्धनाचा भार एकट्या शेतकऱ्यावरच का?
सजीव सृष्टीच्या अन्नसाखळीत वन्यजीवांचे अस्तित्व अनिर्वाय आहे. त्यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे मात्र त्यांच्या संवर्धनाचा सर्व भार शेतकऱ्यांवर पडला आहे. शेतकरी याची फार मोठी किंमत मोजत आहे. यामुळे भविष्यात शेतकरी विरुद्ध वन्यजीव असा घातक संघर्ष उभा राहण्याची भीती आहे.
या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या
रानडुक्करांच्या बेसुमार संख्या नियंत्रणासाठी र्निबिजीकरणासारखे उपाय करावेत.
वनक्षेत्राला तारेच्या कुंपनाने बंदिस्त करावे.
शेतीमध्ये येणाऱ्या रानडुक्करांना मारण्याची परवानगी देण्यात यावी.
पिकांच्या वन्यजीवांकडून झालेल्या नुकसान भरपाईची मिळण्याची प्रक्रिया सुटसुटीत व सुलभ करावी.
मी माझ्या शेतात भाजीपाला उत्पादन घेत होता, बरे चालले होते. मात्र गेल्या तीन ते चार वर्षात आमच्या परिसरात रानडुक्करांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे प्रपंच चालवण्यासाठी आता गोडाऊन मध्ये हमाली करत आहे.
-समाधान भोसले, अल्पभूधारक शेतकरी, कोंडी ता.उ. सोलापूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.