Farmers Agitation : नाशिक निफाड तालुक्यातील ओझर, खेरवाडी, दात्याने, कसबे सुकेणे आणि वडाळीनजीकच्या परिसरात उच्चदाब वीजवाहिनीचे मनोरे उभारण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी मोबदला आणि कायदेशीर प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी ओझर येथे बाधित शेतकरी आणि महापारेषणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या प्रश्नांचे निराकरण होईपर्यंत काम पुढे नेऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली..या बैठकीत शेतकऱ्यांनी सुपीक जमिनींमध्ये वीजवाहिनीचे मनोरे उभारताना शेतीचे होणारे नुकसान, पिकांवरील परिणाम आणि मोबदल्याबाबतच्या अडचणी मांडल्या. पूर्वसंमती, आवश्यक कायदेशीर प्रक्रिया आणि नुकसानभरपाईबाबत स्पष्टता नसतानाही काम सुरू असल्याच्या तक्रारी त्यांनी केल्या. या वेळी कदम यांनी महापारेषणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत शेतकऱ्यांच्या तक्रारींची तातडीने दखल घेण्याची मागणी केली..Soyabean Crop Insurance : गतवर्षीच्या सोयाबीन पीकविम्याच्या प्रतीक्षेत शेतकरी.‘शेतकऱ्यांच्या जमिनीवर काम करायचे आणि त्यांनाच विश्वासात घ्यायचे नाही, हे चालणार नाही. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन कायद्यानुसार योग्य मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय टॉवरलाइनचे काम पुढे जाऊ देणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला..Crop Insurance : पीक विमा भरपाईचा बोजा राज्य सरकारवर वाढणार? 80:110 मॉडेलचा पेच काय?.या बैठकीस महापारेषणचे अधीक्षक अभियंता श्रीकृष्ण नवलाखे, कार्यकारी अभियंता अनंत काळुसे, उपकार्यकारी अभियंता रवींद्र पावरा, सहाय्यक अभियंता आकाश हुच्चे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील, ओझर नगरपरिषदेचे गटनेते सुनील कदम, नगरसेवक वृषाल पगार यांच्यासह विविध पदाधिकारी आणि ओझर, खेरवाडी, दात्याने, कसबे सुकेणे व वडाळीनजीकच्या परिसरातील बाधित शेतकरी उपस्थित होते..कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणीबाधित शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मनोरे उभारणीचे काम थांबविण्याच्या सूचना कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. जमिनीचा वापर, उभ्या पिकांचे नुकसान आणि भविष्यातील शेतीविषयक अडचणी यांचा विचार करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधावा, असेही त्यांनी सांगितले..शेतकऱ्यांच्या जमिनीवर बळजबरीने मनोरे उभारण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा स्पष्ट इशाराही कदम यांनी दिला. दरम्यान, महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.