Baramati News: बदलत्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मागोवा घेत व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत, कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी शेती शक्य आहे, याचा प्रत्यय बारामती येथील ‘ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’द्वारे आयोजित ‘कृषिक’ या शेतीविषयक प्रदर्शनात राज्यातील शेतकऱ्यांना पहिल्याच दिवशी आला..बदलत्या तंत्रज्ञानाचा मागोवा घेत ‘ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’च्या वतीने ज्येष्ठ नेते शरद पवार व सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या पुढाकारातून व जगप्रसिद्ध कंपनी असलेल्या ऑक्सफर्ड व मायक्रोसॉफ्ट यांच्या मदतीने कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून अत्याधुनिक पद्धतीची शेती शक्य आहे, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक कृषीमध्ये शेतकऱ्यांनी अनुभवले. ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी एआय तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शिवारात पोहोचविण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी जाऊन प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्न केले आहेत..AI In Agriculture: ऊस उत्पादन वाढीसाठी ‘एआय’ची कास.असंख्य प्रकारच्या नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी खर्चातील, अधिक उत्पादन देणारी शेती कशी होते, हे शेतकऱ्यांनी बारामतीतील ‘कृषिक’च्या उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी अनुभवले..पारंपरिक शेती सोडून ड्रोन, सेन्सर, सॅटेलाइटच्या मदतीने पिकांना पाणी देण्याचे नियोजन, खतांची मात्र ठरवण्याचे नियोजन, कोणत्या हवामानात कशा प्रकारे पिकांवर औषध फवारणी केली पाहिजे, याची अचूक माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाद्वारे मिळू शकते, ही बाब पुढे आली आहे..Agriculture Technology: शेतीमध्ये ‘इलेक्ट्रो कल्चर’ तंत्रज्ञानाचा वापर.विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र यासारख्या भागातील जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणे यापुढील काळात अनिवार्य आहे, याची जाणीव हे प्रदर्शन बघितल्यानंतर आल्याचे अनेक शेतकऱ्यांनी नमूद केले..या प्रदर्शनादरम्यान प्रत्यक्ष प्रात्यक्षिक समोर असल्यामुळे शेतकऱ्यांनीही त्यावर विश्वास ठेवत किमान तंत्रज्ञान आपल्या शेतीमध्ये कसे वापरता येईल, याचे नियोजन सुरू केल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले..शेती करताना प्रत्येक क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर शक्य आहे, किमान खर्चात त्याचे सकारात्मक परिणाम होत आहेत, ही बाब शेतकऱ्यांना या प्रदर्शनात प्रत्यक्ष पाहता आली. अशक्य वाटणाऱ्या बाबी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामुळे प्रत्यक्षपणे शिवारात होऊ शकतात, ही बाब कृषिक मधील प्रात्यक्षिक प्लॉट पाहिल्यानंतर शेतकऱ्यांना झाली. शेतकरी आणि विद्यार्थी हे दोघेही या तंत्रज्ञानाचा सहजतेने वापर करू शकतात, हेही समजल्याचे काही शेतकरी व विद्यार्थ्यांनी सांगितले..बारामतीतील ‘ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’च्या वतीने सुरू करण्यात आलेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा कृषी क्षेत्रातील वापर, केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक स्तरावरील शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारक ठरणार आहे. मी स्वतः फ्रान्समध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून शेती करतो, मात्र तेथेही अद्याप कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ह्या प्रमाणात सुरू झालेला नाही. जगातील कृषी क्षेत्राला एक वेगळी दिशा देण्याचे काम बारामतीत सुरू असून ट्रस्टच्या मदतीने फ्रान्समध्ये असा उपक्रम सुरू करण्यासाठी तेथील कृषी विभागाशी समन्वय साधण्याचा माझा प्रयत्न असेल.अमित केवल-पाटील, अध्यक्ष. कोण्याक क्लोज द रोम्स, कोण्याक, फ्रान्स.मी २५ एकराची बागायती शेती करतो. त्यात १०-१२ एकर ऊस असतो. माझे उत्पादन सध्या एकरी केवळ ४०-४५ टन आहे. या प्रदर्शनातील एआय आधारित तंत्र पाहून मी थक्क झालो. या तंत्राचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांच्या दारी विकासाची गंगा येईल. मात्र या तंत्र वापराचा खर्च कमी करण्यासाठी सरकारने जास्तीत जास्त अनुदान देण्याची आवश्यकता आहे.भागवत रामभाऊ गिराम, ऊस उत्पादक शेतकरी, मु.पो.पेठ बाभूळगाव, ता.पाथरी, जि.परभणी.शेतीमधील उत्पादन खर्च भरमसाट वाढला आहे. शेतकरी त्यामुळे व्यथित झालेला असताना त्याच्या मदतीला एआय तंत्रज्ञान आल्याचे या प्रदर्शनात आल्यानंतर मला कळले. हे तंत्रज्ञान राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले पाहिजे.नामदेव तुकाराम कोकर, सोयाबीन उत्पादक शेतकरी, मु.पो. मानवत, ता. मानवत, जि. परभणी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.