Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

Rural Congress Protest : संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या वतीने सोमवरी (ता. ३) संविधान चौकात आंदोलन करण्यात येणार आहे.
Maharashtra Congress President Harshwardhan Sapkal
Harshwardhan SapkalAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या वतीने सोमवरी (ता. ३) संविधान चौकात आंदोलन करण्यात येणार आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेल्या निर्देशानुसार नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी कार्यालय इंदिरा गांधी स्मृती भवन येथे जिल्हाध्यक्ष बाबा आष्टनकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नागपूर जिल्ह्यामध्ये सोमवारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलनात्मक कार्यक्रम करण्याबाबत चर्चा व नियोजन करण्यात आले.

महायुती सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला. सोमवारी (ता. ३) संविधान चौक येथे दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत आंदोलन करण्यात येणार आहे. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येईल. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.

Maharashtra Congress President Harshwardhan Sapkal
Farmer Loan Waive : खानदेशात अनेक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रतीक्षा

हुकूमचंद आमधरे यांची महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हाध्यक्ष बाबा आष्टनकर महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती हुकूमचंद आमधरे, प्रदेश महासचिव मुजीब पठाण, तुलसिराम काळमेघ, श्रीराम काळे, जयंत दळवी, शशिकांत मेश्राम, अशोक वानखेड, किशोर मिरे, दुर्योधन ढोणे, बब्बू खान पठाण, विनोद मिसाळ, रमेश दुबे, सतीश चौहान, प्रकाश कोकाटे, डॉ. ओम सोमनकर, आश्विन बैस,

संजय जगताप, अरुण हटवार, नाना कंभाले, दिवाकर जंगले, प्रसनजीत सोमकुवर, विलास काचोरे, धनराज वलुकार, अजय राऊत, बंडू वैद्य, संदीप तेलरांधे, उमेश नागरीकर, दिनकर डेंगे, धुमसिंग जाधव, संजय मिसाळ, संध्या कांबळे, सरोज उईके, उषा देशमुख, मनीष गायकवाड, दिलावर शेख, धनराज उमाळे,

Maharashtra Congress President Harshwardhan Sapkal
Farmer Loan Waive : शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करा ; कर्जमाफीच्या मागणीला जोर

शिवरज जगताप, मयूर हिरेखण, आकाश उके, आशिष दरडे, अशोक वासनिक, रोशन मेश्राम, गोलडी शेख, भोळा मनगटे, नागेश गिरहे, पंकज पाटमासे, रणजीत गायकवाड, रमण ठाकरे आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

सभेचे सूत्रसंचालन प्रकाश कोकाटे यांनी केले. प्रास्ताविक अरुण हटवार यांनी केले. आभार डॉ. ओम सोमनकर यांनी मानले. आंदोलनात बहुसंख्य शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष बाबा आष्टनकर यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com