Crop Insurance : ‘आधार’अभावी मिळेना शेतकऱ्यांना पीकविमा

Aadhar Card Linking : बॅंक खात्याशी वैयक्तिक आधार क्रमांक संलग्न करून घेण्याबाबत वारंवार आग्रह धरल्यानंतर देखील काही विमाधारकांनी दुर्लक्ष केले.
Crop Insurance
Crop Insurance Agrowon
Published on
Updated on

Pune News : बॅंक खात्याशी वैयक्तिक आधार क्रमांक संलग्न करून घेण्याबाबत वारंवार आग्रह धरल्यानंतर देखील काही विमाधारकांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे पावणेदोन लाख शेतकऱ्यांना पीकविमा नुकसान भरपाई मंजूर असली, तरी प्रत्यक्षात रक्कम वितरणात बॅंका असमर्थ ठरल्या आहेत.

पंतप्रधान पीकविमा योजनेच्या खरीप २०२३ हंगामात भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना ‘मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती’ घटकाखाली दिल्या जाणाऱ्या भरपाईचे नियोजन आटोपले आहे. “कृषी विभागाने केंद्र व राज्याकडे पाठपुरावा केल्यामुळे जवळपास ५२.७३ लाख शेतकऱ्यांना २३३० कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर केली आहे. जानेवारीअखेर यातील ४९.५८ लाख शेतकऱ्यांना २२४३ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत” अशी माहिती सूत्रांनी दिली.

Crop Insurance
Crop Insurance : तीन लाख शेतकऱ्यांनी रब्बीत भरला पीकविमा

“पावणेदोन लाख शेतकऱ्यांची विमा भरपाईची रक्कम बाजूला काढून ठेवण्यात आलेली आहे. ‘आधार’अभावी बॅंकांना ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष वर्ग करता आलेली नाही. परंतु शेतकरी आपापली खाती आधारशी संलग्न करतील; त्यापाठोपाठ या रकमादेखील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होत जातील,” अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

दरम्यान, राज्यातील आणखी १.३३ लाख शेतकऱ्यांना विमा भरपाईची रक्कम मिळालेली नाही. कारण या शेतकऱ्यांची भरपाईची रक्कम एक हजार रुपयांपेक्षा कमी आहे. शासनाच्या धोरणानुसार, कोणत्याही शेतकऱ्याला एक हजारापेक्षा कमी भरपाई देता येत नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांबाबत वेगळे नियोजन सुरू आहे.

Crop Insurance
Crop Insurance Help : शेतकऱ्यांना पीकविमा मदतीची प्रतीक्षाच

“राज्यात ‘मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती’ घटकाखाली दिल्या जाणाऱ्या भरपाईची रक्कम एक हजार रुपयांच्या खाली असलेल्या शेतकऱ्यांबाबत आता नैसर्गिक आपत्ती तसेच पीक कापणी प्रयोग अशा दोन घटकांमधून किती रक्कम मिळते ते तपासले जाईल.

ही रक्कम एक हजारापेक्षा अधिक येताच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा होईल. मात्र तीन घटकांची मिळून ही रक्कम पुन्हा एक हजाराच्या खाली येत असल्यास शासन त्यात अजून निधी टाकून प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे भरपाई वर्ग करेल,” असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

विमा भरपाई वितरण स्थिती

- जानेवारीअखेर ४९.५८ लाख शेतकऱ्यांना २२४३ कोटी रुपये वितरित

- ३.१५ लाख शेतकऱ्यांना ८७ कोटी रुपयांचे वितरण बाकी

- १.७३ शेतकऱ्यांचे बॅंक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्न नाही

- एक हजार रुपयांपेक्षा कमी विमा भरपाईची रक्कम असलेल्या यादीत १.३३ लाख शेतकरी. त्यांच्यासाठी स्वतंत्र नियोजन सुरू

- स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकाखाली ३.९६ लाख शेतकऱ्यांना मिळाली भरपाई

- पेरणी करण्याइतपत पाऊस न झालेल्या घटकाखाली २९ हजार ५४१ शेतकऱ्यांना दिली ११.४१ कोटींची भरपाई.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com