
Palghar News : डहाणू तालुका हा १०० वर्षांपासून फलोद्यानाच्या माध्यमातून वर्षभर रोजगार देणारा म्हणून ओळखला जातो. भौगोलिक मानांकन प्राप्त केलेल्या चिकू बागायती या भागात विकसित झाल्या आहेत. वर्षभरात कोट्यवधींचा व्यवहार फक्त चिकू बागायतीमधून होतो, मात्र गेल्या काही वर्षांत नैसर्गिक संकटाच्या माऱ्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
डहाणूतील फळबागायतीचे क्षेत्र पाहता चिकू ३८५० हेक्टर, आंबा ११८४ हेक्टर, नारळ ४०६, केळी ४०, काजू ३६८ व इतर फळ पिकांची २११ हेक्टर जमिनीवर लागवड आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असल्यामुळे शेतीच्या बाबतीत पालघर जिल्हा समृद्ध मानला जातो, मात्र मागील काही वर्षांपासून वातावरणात झालेले बदल, हवामानातील चढ-उतारामुळे उत्पादनात प्रचंड घट झाली आहे.
किंबहुना तौत्के, फियान वादळ, तसेच शेतकऱ्याच्या मेहनतीवर पाणी फिरवणारी अनेक वादळांमुळे पालघर जिल्ह्यातील शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जास्तीत जास्त अर्थार्जन कसे होईल, याकडे शेतकरीवर्ग लक्ष देत असतो.
मार्च ते मेपर्यंत काही प्रमाणात चिकूचे बाजारभाव घसरले असले तरी झाडांवर आलेले फळ वाया न जाता बाजारात विकण्यासाठी कटाक्षाने लक्ष देत असतो. त्याचप्रमाणे वर्षातून एकदा येणारा आंब्याचा हंगाम घेण्यासाठी व फळांच्या विक्रीचे नियोजन करण्याकडे शेतकरी भर देतो, मात्र निसर्गाने साथ दिली नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते, हे काही वर्षांपासून सातत्याने पाहावयास मिळते.
भरपाईचे संकट गंभीर
२०२४ च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. या काळात सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या निर्णय घेऊन दिलासा दिला होता, परंतु आठ महिन्यांनंतरही नुकसानभरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.
त्यातच हवामान आधारित पंतप्रधान हंगामी पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्याला भरपाई मंजूर होऊनही पैसे न मिळाल्यामुळे कृषी अर्थव्यवस्थेवर ताण पडला आहे. शेती बागायतीमध्ये मशागत करण्यासाठी शेतकऱ्याला हात आखडता घेण्याची वेळ आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.