संदीप गायकवाड Solapur News: साखरेचा नवीन गाळप हंगाम तोंडावर आला असतानाही, सोलापूर जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ३६ कोटी रुपये दिलेले नाहीत. यातील मातोश्री शुगर कारखान्याने गाळप केलेल्या उसाचा आतापर्यंत एक रुपयाही शेतकऱ्यांना दिलेला नाही. विशेष म्हणजे, या कारखान्याकडे गाळप परवाना नसतानाही उसाचे गाळप करण्यात आले होते..सोलापूर जिल्ह्यात जवळपास ४१ साखर कारखाने आहेत. नोव्हेंबरमध्ये साखरेचा नवीन गाळप हंगाम सुरू होईल. तरीपण, मागील गाळप हंगामात शेतकऱ्यांचा ऊस नेऊनही सहा कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी दिलेली नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना सरकारकडून भरपाई मिळालेली नाही, बॅंकांकडून कर्जाच्या वसुलीसाठी नोटिसा दिल्या जात आहेत. तरीदेखील, साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे मिळत नाहीत..Niphad Sugar Mill : ‘निसाका’ आमच्या हक्काचा, विक्रीप्रक्रिया रद्द करा .ऊस तुटून कारखान्याला गेल्यावर १५ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक असून विलंब झाल्यास त्या रकमेवरील व्याज देणेही क्रमप्राप्त आहे. कारखान्यांनी व्याज सोडा एफआरपी देखील दिलेली नाही. मातोश्री शुगरवर जल्हा प्रशासनाने ‘आरआरसी’ची कारवाई केली..मात्र जोपर्यंत संचालक मंडळाच्या मालमत्ता जप्त होत नाहीत, तोपर्यंत या कारवाईला फारसा अर्थ नसल्याचे शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे मत आहे. थकलेली एफआरपी न दिल्यास त्या कारखान्यांसमोर व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांना घेऊन ठिय्या आंदोलन करू, असा इशारा आता शेतकरी संघटनांनी दिला आहे.Niphad Sugar Mill : ‘निसाका’ लुटणाऱ्यांचा पर्दाफाश करणार.‘या’ कारखान्यांकडे आहे थकबाकीकारखाना थकबाकीसिद्धेश्वर सहकारी १८ कोटीसिद्धनाथ शुगर १.७४ कोटीजय हिंद शुगर ६.८० कोटीमातोश्री शुगर ५.३८ कोटीसहकार शिरोमणी १.३१ कोटीगोकूळ शुगर २.९१ कोटी.शेतकऱ्यांच्या उसाची रक्कम देण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मातोश्री शुगर कारखान्याच्या दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू असून त्यानंतर शेतकऱ्यांचे पैसे वसूल होतील. पैसे वसुलीसाठी मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आहे. त्याला गती मिळाल्यास शेतकऱ्यांचे पैसे लवकर देता येतील.- प्रकाश अष्टेकर, प्रभारी प्रादेशिक सहसंचालक, साखर संचालनालय, सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.