Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीवरून नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक ; केंद्रीय मंत्री भारती पवारांच्या घरावर धडक देण्याचा प्रयत्न

Union Minister Dr. Bharti Pawar : बाजारातील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झाले आहेत.
Onion Export Ban
Onion Export BanAgrowon
Published on
Updated on

Nashik News : बाजारातील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झाले आहेत.

केंद्र सरकारच्या निर्यातबंदीच्या निर्णयावर प्रहार शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेच्या शेकडो कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या घराकडे कूच केली आहे. मात्र, नाशिक शहर पोलिसांनी शहरातील अशोक स्तंभ परिसरात आंदोलक कार्यकर्ते आणि कांदा उत्पादकांना रोखून धरले आहे.

Onion Export Ban
Onion Export Ban : केंद्र सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर निर्यातबंदीची कुऱ्हाड; राज्यभरात तीव्र पडसाद

केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. केंद्राने ३१ मार्च २०२४ पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच आक्रमक झाला आहे.

या पार्श्वभूमीवर सरकाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी प्रहार शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वात बाईक रॅली काढण्यात आली होती. ही बाईक रॅली चांदवडहून आडगावमार्गे नाशिक शहरात दाखल झाली होती. या रॅलीमध्ये प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेकडो कांदा उत्पादक शेतकरी सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.

Onion Export Ban
Onion Export Ban : कांदा उत्पादकांमध्ये संतापाची लाट

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने मागे घ्यावी, या मागणासाठी शेतकऱ्यांनी आम्हाला केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या घराकडे जावू देण्याची विनंती पोलिसांना केली. यावेळी गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला.

दरम्यान, पोलिसांनी रोखून धरल्याने शेतकऱ्यांनी याच ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तसेच भारती पवार यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com