Farmer Loan : 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय'; सहकारी मंत्री बाबासाहेब पाटील यांचं विधान
Minister Babasahbe Patil Karjmfi : संपूर्ण शेतकरी कर्जमाफी, सरसकट एकरी ५० हजार रुपये अशी मागणी शेतकऱ्यांसह विरोधकांकडून केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. त्यातच राज्याचे सहकारी मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गुरुवारी (ता.९) जळगाव येथे कर्जमाफीवरून वादग्रस्त विधान केलं आहे. त्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे.