

Solapur News : ः पाणी फाऊंडेशन आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ स्पर्धेमध्ये सहभागी उत्तर सोलापूर तालुक्यातील ७ गावांतील १२ शेतकरी गटांनी सोयाबीन बियाणांची एकत्रित खरेदी केली आणि त्यातून या शेतकऱ्यांची तब्बल चार लाख तीस हजार रुपयांची बचत झाली आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील १२ शेतकरी गटांतील शेतकऱ्यांनी तब्बल ६१५ बॅग सोयाबीन खरेदी केल्या आहेत. आता ६१५ एकरांवर सोयाबीनची पेरणी करण्यात येणार आहे. बाजारात २५०० रुपयाला मिळणारी २५ किलोची सोयाबीन बॅग कंपनीकडून केवळ अठराशे रुपयांना मिळाली.
यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति बॅग ७०० रुपयांची बचत झाली. शेतकऱ्यांच्या एकीच्या बळामुळे तब्बल चार लाख तीस हजारांची बचत झाली. शेतकऱ्यांना शेतीतील खर्च कमी करणे आणि उत्पादन वाढविण्यासाठी या स्पर्धेत कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ यांच्याद्वारे डिजिटल शेतीशाळामध्ये मार्गदर्शन केले जाते.
या स्पर्धेत शेती खर्चातील बचतीलाही खूप महत्त्व देण्यात आले आहे, यासाठी वडाळा येथील भूमिपुत्र शेतकरी गटाने प्रमुख भूमिका पार पडली.
वरील सर्व गटांना एकत्रित खरेदी केलेले बियाणांचे वाटप वडाळा येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे, पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक सत्यवान देशमुख, भूमिपुत्र शेतकरी गटाचे मनोज साठे, राजेंद्र ढवण, जयवंत नागणे, उत्तर सोलापूर तालुका समन्वयक अतिश शिरगिरे, वैभव सुरवसे, कृषी विज्ञान केंद्र येथील वरिष्ठ शास्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे, प्रदीप गोंजारी, समाधान जवळगे, डॉ. पी. व्ही. कदम, डाळिंब संशोधन केंद्राच्या गिरी, तालुका कृषी अधिकारी धनंजय शेटे या वेळी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.