Farmer Death : चांदवड तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

Drought Condition : यंदा राज्यातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दुष्काळी परिस्थितीमुळे शिंगवे येथे नैराश्‍यातून शेतकऱ्याने आत्महत्या केली.
Farmer Death
Farmer DeathAgrowon

Nashik News : यंदा राज्यातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. चांदवड तालुक्यातही दुष्काळाची अत्यंत दाहक परीस्थिती आहे. याच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडला असून तालुक्यातील शिंगवे येथे दुष्काळामुळे नैराश्‍यातून शेतकऱ्याने आत्महत्या केली.

Farmer Death
Sugarcane Rate Protest : ऊस आंदोलनाची ही वेळ नाही, राजू शेट्टींना हसन मुश्रीफांचे आवाहन

शिंगवे (ता. चांदवड) येथील चिंधू दादा गुंड या शेतकऱ्याने नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन दिवसांपूर्वी खेलदरी येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती.

Farmer Death
Crop Nutrition : पिकांचे पोषण, वाढीसाठी सूक्ष्मजीवांचे कार्य व महत्त्व

यंदा कमी पाऊस झाल्याने पिके हातची गेली. ही परिस्थिती नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत आहे. रब्बी हंगामदेखील वाया गेला. गेली तीन वर्षे सततची नापिकी, अवकाळी व यावर्षीचा दुष्काळ यामुळे चिंधू गुंड प्रचंड निराश होते.

शिंगवे शिवारात त्यांची दीड एकर शेती आहे. अल्पभूधारक गुंड यांना गेल्या तीन-चार वर्षांपासून शेतीतून काहीच उत्पन्न निघत नव्हते. ते मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होते. अशातच यावर्षी शेतातून काहीही उत्पन्न मिळणार नव्हते. पेरणीचा खर्चही वाया गेल्याने कर्जफेडीची त्यांना चिंता होती, असे कुटुंबीयांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com