Akola News : शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची खिरपूरी येथे बैठक

या वेळी डॉ. लांडे यांनी साठवणुकीत बियाण्याची घ्यायची काळजी, या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
Akola News
Akola NewsAgrowon
Published on
Updated on

Akola Agriculture News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील (Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University) बियाणे तंत्रज्ञान संशोधन (Seed Technology Research) केंद्राच्या वतीने शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची स्थापना करण्यात आली आहे. या मंचाची पहिली बैठक बाळापूर तालुक्यातील खिरपुरी येथे घेण्यात आली.

कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना आवश्‍यक असलेले तंत्रज्ञान देण्याच्या उद्देशाने विविध पिकांचे शास्त्रज्ञ-शेतकरी मंच स्थापन केले जात आहेत. यातूनच स्थापन या मंचाच्या बैठकीला ३२ शेतकरी उपस्थित होते.

Akola News
Power Generation : राष्ट्रीय वीजनिर्मिती प्रकल्पात शेतकरी कंपन्यांची आज बैठक

बैठकीत डॉ. गजानन लांडे, डॉ. वासुदेव मते, रतन इडोळे व अभिलाषा खारकर, कृषी सहाय्यिका कु. ए. एस. निलखन व आत्मा तंत्र अधिकारी व्ही. एम. शेगोकार यांनी शेतकऱ्यांना या संकल्पनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

Akola News
Cucumber Seed : काकडीच्या सदोष बियाण्याची विक्री

या वेळी सर्वानुमते मंचाच्या सदस्यांची कार्यकारिणी बनवण्यात आली. या मंचाची कार्यपद्धती ठरविण्यात आली असून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी निवड केलेल्या गावात विद्यापीठाच्या कृषी शास्त्रज्ञांद्वारे प्रत्यक्ष भेटीची नियोजनबद्ध रूपरेषाही निश्चित करण्यात आली.

या वेळी डॉ. लांडे यांनी साठवणुकीत बियाण्याची घ्यायची काळजी, या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. मते यांनी काढणीपश्चात बियाण्याच्या घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती दिली.

या कार्यक्रमास बियाणे तंत्रज्ञान संशोधन केंद्रातील बियाणे संशोधन अधिकारी डॉ. आम्रपाली आखरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी शास्त्रज्ञ मंच स्थापन करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com