Gondiya News: केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी (ता. १३) कृषी विज्ञान केंद्र, हीवरा (गोंदिया) येथे भेट देऊन शेतकरी व शास्त्रज्ञांशी संवाद साधला. विद्यापीठाचा शेतकरी शास्त्रज्ञ मंच हा उपक्रम अत्यंत यशस्वी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली..केव्हिके परिसरात वृक्षारोपण करून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. त्यानंतर कृषी उत्पादने व तांत्रिक प्रदर्शनीतील स्टॉलची पाहणी करत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या तांदूळ, दुग्धजन्य, सेंद्रिय व प्रक्रिया उत्पादनांचे त्यांनी कौतुक केले. गोंदिया जिल्ह्यातील उत्पादनांना राष्ट्रीय बाजारात मोठी संधी असून मूल्यवर्धन व ब्रँडिंगवर भर देण्याचे त्यांनी आवाहन केले..KVK Washim: कृषी विज्ञान केंद्रात शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक.यावेळी बोलताना कृषिमंत्री म्हणाले, की विदर्भातील शेतीचे भविष्य बहुविध पीक पद्धती, तेलबिया–डाळी उत्पादन वाढ आणि बागायती शेतीवर आधारित आहे. शेतकरी–शास्त्रज्ञ मंचमुळे तंत्रज्ञान थेट शेतापर्यंत पोहोचत आहे, हे अत्यंत सकारात्मक आहे..केव्हीके गोंदियाच्या बायो-खत व बायो-कीटनाशक युनिटची पाहणी करताना त्यांनी रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून जैविक शेतीकडे वळण्याची गरज व्यक्त केली. डॉ. डी. बी. उंदिरवाडे (संचालक, कृषी विस्तार, शिक्षण, डॉ. पं. दे. कृ.वि., अकोला) यांनी, पावसावर अवलंबून असलेल्या विदर्भातील शेतीला जलसंधारण, बहुपीक पद्धती व स्थानिक परिस्थितीनुसार विकसित फायदेशीर शेती मॉडेलद्वारे बळकटी देणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.Agriculture Innovation: शेतकऱ्यांच्या शास्त्रोक्त प्रयोगांचा इतरांनी अवलंब करावा : राज्यपाल.वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. विशाल उबरहांडे यांनी सांगितले, की के. व्ही. के. गोंदियाने प्रथम रेषीय प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून तेलबिया पिकांचे क्षेत्र वाढवले असून शेतकरी-शास्त्रज्ञ मंचमुळे शेतकऱ्यांच्या समस्या थेट चर्चेत येत आहेत..कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांद्वारे थेट संवाद साधून आमच्या प्रश्नांना उत्तरे दिली. पीक विविधीकरण व नैसर्गिक शेतीबाबत मिळालेल्या मार्गदर्शनामुळे शेतीत नवे प्रयोग करण्याचा आत्मविश्वास मिळाला, असे मत व्यक्त केले..या वेळी डॉ. शाकिर अली (अटारी, पुणे) उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद पर्वते यांनी केले. के. व्ही. के. गोंदिया तसेच भंडारा, गडचिरोली, वर्धा, नागपूर व सिंदेवाही येथील कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.