Maharashtra Farmer Relief: अमरावती, पुणे, नागपूर व कोकण विभागातील आठ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना जून आणि जुलै २०२६ या कालावधीत झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी २३ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपये निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय मदत व पुनर्वसन विभागाने गुरुवारी (दि. २७ ऑगस्ट) जारी केला..चार विभागाच्या आयुक्तांनी जून आणि जुलै महिन्यात अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार शासनाने मदत मंजूर केली आहे..Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर.अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा या चार जिल्ह्यांतील ९ हजार ६८३ शेतकऱ्यांचे ६ हजार ६२८ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले होते. तसेच पुणे विभागातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातील ६ हजार ८८५ शेतकऱ्यांचे ४ हजार १३० हेक्टर, नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यात ६६१ शेतकऱ्यांचे ४४७ हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाले होते. त्यांच्या मदतीसाठी निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. .Farmer Relief: आता कुठल्याही शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पकडायचा नाही, महसूलकडून तहसीलदार, तलाठ्यांना महत्त्वाचे आदेश.अमरावती विभागात जुलै महिन्यात संततधार पावसामुळे शेतात पाणी साचून सोयाबीन, कापूस, तूर आणि मका आदी खरीप पिकांना फटका बसला होता. .अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडेल यासाठी शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरुपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदत दिली जाते. .नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी वळती करु नयेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना सूचना जारी कराव्यात, असे शासन निर्णयात नमूद केले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.