Shetakari Sanghaṭana: शेतीमालाला योग्य भाव, सरसकट कर्जमुक्ती आणि पीकविम्यातील जाचक अटी यांसह विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. येत्या १५ दिवसांत या मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यास राज्यभर गनिमी काव्याने आंदोलन छेडले जाईल, अशी घोषणा संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली..तापोळा (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथे आयोजित संघटनेच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर आणि कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरात पहिल्या दिवशी केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचे परखड विश्लेषण करण्यात आले. दुसऱ्या दिवशी संघटनेची आगामी दिशा आणि लढ्याची रूपरेषा निश्चित करण्यात आली..Farmer Protest: आंबा, काजूची भरपाईची घोषणा न झाल्यास आंदोलन.तुपकर म्हणाले की, भारत-अमेरिका व्यापार करारामुळे शेतमालाचे दर कोसळले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हा करार रद्द झालाच पाहिजे. बैठकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. त्यात प्रामुख्याने राज्य सरकारने दिलेली २ लाखांची कर्जमाफी मान्य नसून किमान ५ लाखांपर्यंत सरसकट कर्जमुक्ती द्यावी आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना १.५ लाखांचे सवलत अनुदान मिळावे.सध्याची पीकविमा योजना शेतकरीविरोधी आहे. .Farmer Protest: आंबा, काजू बागायतदारांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला.सरकारने खासगी कंपन्यांना काम न देता स्वतःची विमा कंपनी स्थापन करावी. पीकविमा योजना सुलभ असावी, सोयाबीनला भाव मिळण्यासाठी 'डीओसी' निर्यात तातडीने सुरू करावी, आज खेड्यापाड्यात मायक्रो फायनान्स कंपन्या आणि पतसंस्थांनी पठाणी वसुली सुरू केली आहे. मुद्दलापेक्षा दुप्पट वसुली न करण्याचा कायदा असतानाही पाचपट वसुली होत आहे, यावर कडक निर्बंध घालावेत, शेतकऱ्यांना शेतीसाठी पूर्णवेळ वीज, सिंचनाचे पाणी आणि प्रत्येक गावात गोदाम व कोल्ड स्टोअरेज, नवतंत्रज्ञान मिळावे यासह विविध ठराव मंजूर करण्यात आले. .त्यांनी क्रांतिकारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याचेही आवाहन केले. संघटनेतील निष्क्रिय पदाधिकाऱ्यांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. सरकारने १५ दिवसांची मुदत पाळली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी आंदोलनाचा भडका उडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे, गजानन अमदाबादकर, ॲड. शर्वरी तुपकर यांच्यासह राज्यभरातील क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.