Maharashtra Farmer Loan Waiver Second Installment: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पहिल्या यादीतील पात्र शेतकऱ्यांसाठी दुसरा हप्ता सोमवारी (ता. २४) जमा करण्यात आला. या टप्प्यात राज्यातील ६ लाख ३६ हजार ३६ शेतकऱ्यांच्या खात्यांवर एकूण ५ हजार ८६ कोटी ३० लाख ६२ हजार ३०० रुपये जमा करण्यात आले आहेत..पहिल्या टप्प्यात ६ लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांना ५ हजार २८ कोटी ७० लाख ३८ हजार रुपये वितरित करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने रक्कम वितरित करण्यात आली. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते..Farm Loan Waiver: बोटांचे ठसे उमटत नाहीत? काळजी करू नका; अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ, सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय.दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक लाभार्थी छत्रपती संभाजीनगर विभागात ३ लाख २ हजार २७३ असून, त्यांच्या खात्यावर २ हजार २८४ कोटी ४४ लाख ६ हजार ५९० रुपये वितरित करण्यात आले. या विभागात बीडमध्ये ४०० कोटी ३२ लाख, छत्रपती संभाजीनगरमध्ये २८७ कोटी ३२ लाख, धाराशिवमध्ये १८३ कोटी ८५ लाख, हिंगोलीमध्ये १९५ कोटी ६१ लाख, जालन्यात ३६६ कोटी २७ लाख, लातूरमध्ये १२१ कोटी ७ लाख, नांदेडमध्ये ३८१ कोटी ९४ लाख आणि परभणीत ३४८ कोटी २ लाख रुपये वितरित करण्यात आले..अमरावती विभागात १ लाख ४५ हजार ८०८ शेतकऱ्यांच्या खात्यावर १ हजार २०८ कोटी ३४ लाख ३० हजार रुपये जमा करण्यात आले. यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचा वाटा सर्वाधिक असून, तेथील ५२ हजार ५२९ शेतकऱ्यांसाठी ४०६ कोटी ११ लाख ४८ हजार रुपये जमा करण्यात आले. अकोल्यात १४० कोटी ८२ लाख, अमरावतीत २१५ कोटी ७५ लाख, वाशिममध्ये १५० कोटी ५ लाख, यवतमाळमध्ये २९५ कोटी ५८ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत..Farm Loan Waiver: 'कर्जमुक्ती'साठी दुसऱ्या टप्प्यात ४ हजार कोटी निधी वितरित, शासन निर्णय जारी.नाशिक विभागातील ८४ हजार ८१३ शेतकऱ्यांना ७५६ कोटी ४ लाख १८ हजार रुपये वितरित करण्यात आले. यात अहिल्यानगरला ४११ कोटी ४८ लाख, धुळ्यात १०३ कोटी ६४ लाख, जळगावमध्ये १०० कोटी ५६ लाख, नंदुरबारमध्ये ५३ कोटी ८३ लाख आणि नाशिकमध्ये ८६ कोटी ५१ लाख रुपये वितरित करण्यात आले..पुणे विभागात ४९ हजार २२४ लाभार्थ्यांच्या खात्यात ४१७ कोटी ३७ लाख १० हजार ४२२ रुपये वितरित करण्यात आले. यात कोल्हापूरला ४७ कोटी ७१ लाख ४६ हजार ६१६, पुण्याला १३८ कोटी ७१ लाख ९ हजार २३१, सांगलीला ६७ कोटी २५ लाख ९८ हजार ४३, साताऱ्याला ५४ कोटी ५८ लाख ५३ हजार आणि सोलापूरमध्ये १०९ कोटी १० लाख ३ हजार २०३ रुपये जमा करण्यात आले..नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांतील ४४ हजार ८६४ लाभार्थ्यांच्या खात्यात ३६५ कोटी ९५ लाख ६९ हजार ९२७ रुपये वितरित करण्यात आले. यात भंडारा ५४ कोटी ९६ लाख ६१ हजार, चंद्रपूर ६४ कोटी ३२ लाख ४५ हजार, गडचिरोली ९ कोटी ८३ लाख ७८ हजार, गोंदिया ३० कोटी ३० लाख ३८ हजार, नागपूर ९४ कोटी ६१ लाख ५८ हजार आणि वर्ध्यात १२० कोटी ९० लाख ८७ हजार रुपये जमा करण्यात आले..कोकण विभागातील ९ हजार ५४ शेतकऱ्यांना ५४ कोटी १५ लाख २७ हजार रुपये वितरित करण्यात आले. यात सर्वांत कमी सिंधुदुर्गातील ९२९ शेतकऱ्यांना ५ कोटी ५० हजार ७१ रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.