Ravikant Tupkar : शेतकरी नेते तुपकर यांची पुन्हा आंदोलनाची हाक; सरकारलाही इशारा

Ravikant Tupkar On Mahayuti Goverment : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर सरकारला ३ सप्टेंबरपर्यंत सर्व मागण्या मान्य करा, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा दिला आहे. 
Ravikant Tupkar
Ravikant TupkarAgrowon
Published on
Updated on

Pune News : शेतकरी कर्जमुक्ती, सोयाबीन व कापूस पिकांच्या दरवाढीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आणि शेतकरी आत्महत्यावरून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. तसेच सरकारला ३ सप्टेंबरपर्यंतची मुदत देताना आमच्या सर्व मागण्या मान्य करा, अन्यथा ४ सप्टेंबर पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करू, असा इशारा शनिवारी (ता.३१) पत्रकार परिषदेत तुपकर यांनी दिला आहे.

सोयाबीन, कापूस आणि शेती पिकाला योग्य भाव मिळावा, १०० टक्के पिक विमा मिळावा, तसेच इतर मागण्याही सरकारने ३ सप्टेंबरपर्यंत मंजूर करा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. पण जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर ४ सप्टेंबरपासून सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर बेमुदत अन्न त्याग आंदोलन करू, असा निर्धार तुपकर यांनी बोलून दाखवला आहे.

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar : ...सरकारला जड जाईल; रविकांत तुपकरांचा सरकारला पुन्हा इशारा

राज्यात सरकार गाजावाजा करत लाडकी बहिण योजनेसाठी ४६ हजार कोटींची तरतूद केली. मग राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी २० ते २५ हजार कोटींची तरतूद सरकार का करत नाही? असा सवाल तुपकर यांनी केला आहे. राज्यातला शेतकरी थकला असून तो हतबल झाला आहे. त्यामुळेच राज्यात सतत आंदोलने केली जात आहे. पण आंदोलन केलं की सरकार आम्हाला अटक करतं आणि तुरूंगात टाकतं. मात्र आता सरकारला शेवटचं अल्टीमेटम असून सोयाबीन कापसाची दरवाढ करा, संपूर्ण कर्जमाफी करा, १०० टक्के पीकविमा द्या, शेतीला मजबूत कपांउडसह इतर मागण्यांच्याबाबती सरकारने ३ सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्यावा. अन्यथा ४ सप्टेंबरपासून सिंदखेडराजा येथील माँसाहेब जिजाऊ राजवाड्यासमोर बेमुदत अन्न त्याग आंदोलन करणार आहे. तर जोपर्यंत राज्य सरकार शेतकऱ्यांना न्याय देणार नाही, तोपर्यंत अन्नाचा एक कणही घेणार नाही, असे तुपकर यांनी म्हटले आहे.

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar : वर्षा बंगल्यावर घुसू म्हणणाऱ्या रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस

तर आमच्या जीविताला काही बरं वाईट झाल्यास त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी माझा जीव शहीद करायला तयार असल्याचेही तुपकर यांनी म्हटले आहे. सोयाबीन-कापूस दरवाढ, शेतकरी कर्जमुक्ती, पिकविमा, यासह शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलनावर आपण ठाम असून शेतकऱ्यांनी देखील ४ सप्टेंबर नंतर राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरावे असे आवाहन तुपकर यांनी यावेळी केले. 

सावंत यांना धडा शिकविला जाईल 

यावेळी तुपकर यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा धाराशिव येथील वाशी तालुक्यातील कोठावळा पिंपळगाव गावात गाव संवाद दौऱ्यावेळी एका शेतकऱ्याला दमदाटी केल्यावरून समाचार घेतला. एका मंत्र्याने शेतकऱ्याशी असंवैधानिक पद्धतीने बोलणं दुर्दैवी आहे. शेतकऱ्यावर जर कोणी दादागिरी करत असेल, अर्वाच्च भाषा वापरत असेल तर ते कदापि खपवून घेतलं जाणार नाही. सावंत यांना धडा शिकविला जाईल, असा इशारा तुपकर यांनी दिला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com