Ravikant Tupkar : महाराष्ट्राच्या राजकारणात नवी संघटना; शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी स्थापना केली क्रांतिकारी शेतकरी संघटना

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. तर दुसरीकडे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मोठी घोषणा केली आहे.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकारणात नव नवे प्रयोग होत आहेत. तिसऱ्या आघाडीसह रासपने आणि मनोज जरांगे पाटील यांनी महाविकास आघाडीसह महायुतीचे टेन्शन वाढले आहे. याचदरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपल्या संघटनेची घोषणा मंगळवारी (ता.२२) केली. क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना करताना बुलढाण्यातून निवडणुकीच्या मैदानात उरतण्याचा निर्धार तुपकर यांनी केला आहे.

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत असून जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीत रस्सी खेच सुरू आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मराठवाड्यातील १२ जागांवरून संबंध ताणले आहेत. अशातच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यामधून जाहीर मेळावा सोमवारी घेतला. त्यांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना केली. तसेच विधानसभा मिळण्यासाठी सकारात्मक निर्णय होत असेल तर ठीक, नाहीतर आपण आपला निर्णय घेऊ, असा निर्धार तुपकर यांनी केला आहे.

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar : तुपकर ‘सीमोल्लंघना’च्या तयारीत?

दरम्यान तुपकर यांनी याआधी तिसऱ्या आघाडीत जाण्याची तयारी केली होती. याबाबत प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू आणि तुपकर यांच्यात चर्चा देखील झाली होती. पण माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तिसऱ्या आघाडीत प्रवेश केल्याने तुपकर यांनी काढता पाय घेतला होता.

महाविकास आघाडीकडे जवळीक वाढवताना त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेतली. यानंतर तुपकर शरद पवार यांच्याकडे उमेदवारी मागतील अशी चर्चा रंगली होती. तर मविआकडे तुपकर यांनी बुलढाणा विधानसभेची मागणी करणारा प्रस्ताव दिला होता.

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar : सरकारने शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला, पण शेतकरी समाधानी नाही; सोयापेंड निर्यातीचा निर्णय घ्यावा : रविकांत तुपकर

यादरम्यान पुलाखालून बरेच पाणी गेले असून तुपकर यांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केला आहे. तसेच मविआकडे दिलेल्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय होत असेल तर ठीक, नाहीतर निर्णय घेऊ, असे तुपकर यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

तुपकर यांनी राज्यातील २७ जिल्ह्यात आपल्या शेतकऱ्यांची वोट बँक आहे. यामुळे मविआने त्यांचा निर्णय उद्यापर्यंत कळवावा. तर आपली तयारी झाली असून जेथे आपल्याला संधी आहे तेथे आपण लढू. आम्हाला सन्मानाने सोबत घ्या, लाचारी करणार नसल्याचा इशारा दिला आहे.

तर पहिला पर्याय मविआचा, त्यानंतर वंचितचा असून येथेही विचार न झाल्यास आपण स्वतंत्र उभे राहू. सध्या मविआ किंवा वंचित असे दोनच पर्याय असून त्यांच्या निर्णयाची वाट पाहू. अन्यथा कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून आणायचे याचा विचार करू. तसेच गनिमी काव्याने निवडणूक लढवावी लागेल, असा इशारा रविकांत तुपकर यांनी मविआला दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com