Farmer ID for Forest Land Farmers: राज्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. .वनहक्क कायदा २००६ नुसार संबंधितांना वनजमिनीचे अधिकार प्राप्त होतात. अधिकार मिळालेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी शेतकऱ्यांचा समावेश ‘ॲग्रीस्टॅक’ प्रकल्पामध्ये करण्यात येत आहे. या नोंदणीमुळे दुर्गम भागातील वनपट्टाधारक शेतकरी विविध सरकारी योजनांमधील डिजिटल सेवांशी जोडले जातील..Farmer ID For Fertilizer : शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी 'फार्मर आयडी' बंधनकारक; सरकारच्या हालचाली सुरु?.शेतकऱ्यांना जवळच्या नागरी सुविधा केंद्रावर (सीसीएस) जाऊन मोफत नोंदणी करता येईल. नोंदणीमुळे थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) प्रणालीद्वारे विविध कृषी योजनांचे अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईल. नैसर्गिक आपत्तीत पीक नुकसानीनंतर विमा वाटप आणि सरकारी मदत वाटप सोपे होईल. डिजिटल सातबारा, पीक पेरा आणि इतर कृषिविषयक सेवा एका क्लिकवर उपलब्ध होतील..Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती.कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले, की प्रत्येक वनपट्टाधारक शेतकऱ्याला डिजिटल कृषी सेवांचा लाभ मिळावा, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. ‘फार्मर आयडी’मुळे योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता येईल. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी त्वरित नोंदणी पूर्ण करावी..नोंदणीसाठी काय लागेल?वनपट्टाधारक शेतकऱ्यांना नोंदणीसाठी येताना आपले वनपट्टा प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक आणि ‘आधार’शी लिंक असलेला मोबाइल क्रमांक सोबत ठेवणे आवश्यक आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.