Irrigation Project : नीरा उजवा कालव्याच्या पाण्यासाठी ठिय्या

Neera Right Bank Canal : नीरा उजवा कालव्याच्या पाण्यासाठी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी महूद येथे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
farmer Protest
farmer ProtestAgrowon
Published on
Updated on

Sangola News : नीरा उजवा कालवा सांगोला शाखा फाटा क्रमांक पाचला पाणी मिळावे, यासाठी ढाळेवाडी फाटा, महूद, ता. सांगोला, जि. सोलापूर या ठिकाणी शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. २४) ठिय्या आंदोलन केले. ‘आम्हाला नेहमी आंदोलन केल्याशिवाय पाणी मिळणारच नाही का? आमच्या तालुक्यावरच पाण्यासाठी अन्याय का होतोय?’ असा संतापही शेतकऱ्यांनी या वेळी व्यक्त केला.

farmer Protest
सांगोला तालुक्यात आठ छावणीचालक संस्थांसह ८४ जणांवर गुन्हे

नीरा उजवा कालव्याचे पाणी ‘टेल टू हेड’ याप्रमाणे द्यावे, असे असताना देखील सांगोला तालुक्यातील टेलला असणाऱ्या फाट्यावरील मेथवडे, संगेवाडी, मांजरी, शिरभावी इत्यादी गावांना अद्यापही नीरा उजवा कालव्याचे पाणी मिळाले नाही. कालव्याच्या फाट्यांवरील असलेल्या शेवटच्या गावांवरील शेतीसाठी अगोदर पाण्याची व्यवस्था केली असताना, देखील पाणी का मिळत नाही, असे येथील शेतकरी बोलून दाखवत आहेत. सततच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नीरा उजवा सांगोला फाटा क्रमांक पाचला अद्यापही पाणी दिले नसल्याने या फाट्यावरील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत ढाळेवाडी, महूद येथे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

farmer Protest
Khadakwasla Canal : खडकवासला बोगदा कालवा अहवाल छाननीचे काम सुरू

दुष्काळी स्थितीतही पाण्याचे नियोजन का नाही?

नियमाप्रमाणे ‘टेल टू हेड’ पाणी दिले पाहिजे, असे असतानाही सांगोला तालुक्यावरच पाणीवाटपासाठी नेहमी अन्याय होत आहे. तालुक्यातील नीरा उजवा पाणी वेळेवर का व कोणामुळे मिळत नाही? याला जबाबदार कोण असा प्रश्‍न सध्या शेतकरी विचारत आहे.

नेते मंडळींनी याचा गांभीर्याने विचार करून टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा या सिंचन प्रकल्पांतून पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करावा. अन्यथा, माण नदीपात्रात अर्धनग्न आंदोलन करून नेतेमंडळीसह सरकारला जागे करणार.
तानाजी पाटील, शेतकरी, सांगोला
नीरा उजवा पाणी वाटप हे ‘टेल टू हेड’ या नियमाप्रमाणे झाले पाहिजे. परंतु आम्ही नीरा उजवा फाट्याच्या शेवटच्या असणाऱ्या संगेवाडी, मांजरी, शिरभवी इत्यादी गावांना नेहमीच पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. आम्हाला आमच्या हक्काचे नियमाप्रमाणे पाणी वाटप झाले पाहिजे.
दामोदर पवार, शेतकरी, संगेवाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com