Agriculture Thieves : शेतीपंप केबल, ठिबक चोरट्यांमुळे शेतकरी जेरीस

Agriculture Pump Thieves Update : खानदेशात केळी पट्ट्यात शेतात वापराविना पडून असलेले ठिबक संच, शेतीपंपांच्या केबल व अन्य शेतीसाहित्य चोरी वाढली आहे.
Agriculture Pump
Agriculture PumpAgrowon

Jalgaon News : खानदेशात केळी पट्ट्यात शेतात वापराविना पडून असलेले ठिबक संच, शेतीपंपांच्या केबल व अन्य शेतीसाहित्य चोरी वाढली आहे. तसेच शेतातील शेतीपंपांवरील यंत्रणा, शेतीपंपांचे स्टार्टर आदींची नासधूस, तोडफोड करण्याचे प्रकार वाढले असून, शेतकरी जेरीस आले आहेत.

Agriculture Pump
Solar Agriculture Pump : सौर कृषिपंपांच्या किमतीत पुन्हा वाढ

जिल्ह्यात यावल, रावेर, जळगाव, चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा, अक्कलकुवा भागात शेतीपंपांची यंत्रणा, ठिबक रातोरात शेतातून चोरून नेली जाते. असे प्रकार रोज घडतात. यावलमधील भालोद येथे मागील पाच ते सहा दिवसांत मगनलाल गडे यांच्या शेतातील विहिरीतील शेतीपंप, केबल, सर्व्हिस केबल चोरीस गेली आहे. भालोदमधीलच अशोक महाजन यांच्या शेतातील शेतीपंप, केबल चोरट्यांनी लांबविले आहे.

असेच प्रकार दिवसागणिक वाढत आहेत. रोज शेतांत चोऱ्या होतात. पण तपास लागत नाही. शेतकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी फुपनगरी (ता. जळगाव) शिवारात शेतकरी चंद्रकांत रा. जाधव यांच्या शेतातील मुख्य जलवाहिनीवरी व्हेंच्युरीची नासधूस अज्ञात भामट्यांनी केली होती. याबाबत जाधव यांनी पोलिसात तक्रार केली होती. परंतु कुणी पोलिस कर्मचारी शेतात पाहणीसाठी देखील आला नाही.

Agriculture Pump
Agriculture Pump Theft : शेतात पाईप, सिंचन यंत्रणांची नासधूस, चोरीचे प्रकार

पोलिस शेतातील चोरीप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेतात. पण पुढे या प्रकरणाचा तपास, पाहणी, चौकशी असे कोणतेच सोपस्कार पोलिस करीत नाहीत. यामुळे चोरट्यांचे फावते व हे प्रकार सुरूच आहेत. आता शेतात केळी, पपई, भाजीपाला पिके आहेत. तसेच हळद, कापूस लागवडीचे दिवस आहेत.

अशात शेतीपंपांची यंत्रणा चोरीस गेल्यास सिंचनाचे काम एक-दोन दिवस बंद होते. उष्णता वाढली आहे. पिकास एक दिवसदेखील पाणी देण्यास उशीर झाल्यास त्याचे नुकसान होते. या स्थितीत किंवा चोरीच्या घटनांत पिके वाचवायची कशी असा प्रश्‍न आहे. नैसर्गिक समस्या असतानाच चोरी, नासधूस यामुळे शेतकरी जेरीस आले आहेत. तापी, गिरणा, अनेर पट्ट्यात रोज शेतीपंप, केबल चोरी होते. याबाबत पोलिस यंत्रणांनी चोख तपासणी करून संबंधितांना शिक्षा करावी, अशी मागणी केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com