Vani Sub Market Commitee : वणी उपबाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणावा : प्रशांत कड

Prashant Kad : दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वणी उपबाजार आवारात शेतकऱ्यांनी भाजीपाला व फळभाज्या विक्रीसाठी आणाव्यात, असे आवाहन सभापती प्रशांत कड यांनी केले.
Prashant Kad
Prashant Kad Agrowon
Published on
Updated on

Vani News : दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वणी उपबाजार आवारात शेतकऱ्यांनी भाजीपाला व फळभाज्या विक्रीसाठी आणाव्यात, असे आवाहन सभापती प्रशांत कड यांनी केले. येथे भाजीपाला खरेदी-विक्रीचा शुभारंभ शुक्रवारी (ता. १५) दुपारी करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

प्रमुख पाहुणे म्हणून कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, बाजार समिती संस्थापक गणपतराव पाटील,उपसभापती कैलास मवाळ, प्रकाश शिंदे, प्रकाशआण्णा कड, नामदेवराव घडवजे, बाजार समितीचे संचालक मंडळ, सचिव व मान्यवरांच्या हस्ते लिलावाचा शुभारंभ करण्यात आला.

Prashant Kad
Har Ghar Nal Yojana : ‘हर घर जल’ योजनेच्या कामांसाठी मार्चअखेरची मुदत

५ जानेवारी १९८९ रोजी दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापना करण्यात आली. तेव्हापासून बाजार समितीत फक्त कांदा, टोमॅटो व धान्याची खरेदी-विक्री सुरू होती. आता ३५ वर्षानंतर प्रथमच भाजीपाला मार्केट सुरू झाल्याने शेतकऱ्यांना नाशिक, सुरतऐवजी वणी येथे भाजीपाला विक्री करता येणार आहे.

Prashant Kad
Land Dispute : स्थानिक पुढाऱ्याची हुशारी

नंदलाल चोपडा, बाळासाहेब घडवजे, जमिर शेख, दत्तू राऊत, अमित चोरडिया, पोपटराव थोरात उपस्थित होते. गंगाधर निखाडे यांनी सूत्रसंचालन केले. जे. के. जाधव यांनी आभार मानले.

व्यापाऱ्यांमध्ये समाधान

आजच्या भाजीपाला लिलावात शेवगा, वाल, वांगी, मेथी, भोपळा, घेवडा, मिरची, काकडी, कोथिंबीर, कोबी, फ्लावर आदींसह सर्वच प्रकारचा भाजीपाला आल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. भाजीपाला लिलावाचा फायदा सुरगाणा, कळवण, अभोणा, देवळा, सटाणा, चांदवड परीसरातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com