Pune News: राज्य सरकारच्या कृषी विभागाने साथी पोर्टल-२ चा वापर सक्तीचा केल्याने राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टिसाइड्स सीड्स डीलर्स असोसिएशनच्या (माफदा) आवाहनानुसार मंगळवारी (ता. २८) जिल्ह्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्रे एक दिवस बंद ठेवण्यात आली. .या संपामध्ये सुमारे २२०० कृषी सेवा केंद्राचा समावेश असल्याची माहिती पुणे जिल्हा अॅग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष महेश मोरे यांनी दिली. पुणे जिल्हा अॅग्रो डीलर्सचे कार्याध्यक्ष मधुकर भरणे आणि सचिव आकाश गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, साथी पोर्टल २ च्या.SATHI Portal-2 : कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा मंगळवारी राज्यव्यापी बंद.अंमलबजावणी विरोधात विक्रेत्यांनी अनेक तक्रारी केल्या असून, त्या तक्रारींचा विचार करूनही शासनाकडून कोणतीही सकारात्मक कार्यवाही झालेली नाही..Fertilizer Dealers Issue: निविष्ठा विक्रेत्यांना आरोपीच्या यादीतून कायमचे वगळा.त्यामुळे संघटनेने राज्यव्यापी बंदचा निर्णय घेतला. या निर्णयास सर्व जिल्हा व तालुका संघटनांनी मान्यता दिल्यानंतर, सर्व विक्रेत्यांनी साथी पोर्टल-२ अंमलबजावणीविरुद्ध आंदोलन केले..साथी पोर्टल-२ च्या सक्तीमुळे विक्रेत्यावर अनावश्यक ताण पडत आहे. शासनाने विक्रेत्यांच्या मागण्यांबाबत प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांना निवेदन दिले आहे. वरिष्ठ पातळीवर बैठक घेण्याचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे लवकर तोडगा काढण्याची मागणी आहे.महेश मोरे, अध्यक्ष, पुणे जिल्हा अॅग्रो डीलर्स असोसिएशन, पुणे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.