Sugarcane Commissionarate : तक्रारींच्‍या निराकरणासाठी साखर आयुक्‍तालयात सोय

Sugarcane Season : ऊसतोडणी मजूर व मुकादम, वाहतूक कंत्राटदार यांच्याकडून ऊस तोडणीकरिता पैशांची मागणी होत असल्यास कारवाई करण्याबाबत साखर आयुक्त कार्यालयाने ८ डिसेंबर २०२३ रोजी पत्र दिले आहे.
Sugar Commissionarate
Sugar Commissionarate Agrowon
Published on
Updated on

Satara News : ऊसतोडणी मजूर व मुकादम, वाहतूक कंत्राटदार यांच्याकडून ऊस तोडणीकरिता पैशांची मागणी होत असल्यास कारवाई करण्याबाबत साखर आयुक्त कार्यालयाने ८ डिसेंबर २०२३ रोजी पत्र दिले आहे.

त्यानुसार साखर कारखान्याने याबाबतच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी नोडल अधिकारी यांची नियुक्ती करून संपर्क क्रमांक प्रसिद्ध करावयाचा आहे.

Sugar Commissionarate
Sugarcane Surveying : ऊस सर्व्हेक्षणासाठी आता ‘एआय’ची मदत घेणार

कारखान्यांकडून तक्रारींचे निराकरण न झाल्यास प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे यांच्या कार्यालयास विहित नमुन्यात rjdsugarpune@gmail.com या संकेतस्थळावर तक्रार करण्याच्या सूचना सहकारी संस्थेचे (साखर) विशेष लेखापरीक्षक अजय देशमुख यांनी केले आहे.

राज्यातील साखर कारखान्यांकडून होत असलेल्या वजन काट्यांचा वापर व दक्षता, तसेच साखर कारखान्यांचे वजन काटे तपासणीसंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत १८ ऑक्टोबर २०२२, ९ नोव्हेंबर २०२२ व २५ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या परिपत्रकानुसार सूचना देण्यात आल्या होत्या.

Sugar Commissionarate
Sugarcane Cultivation : खानदेशात ऊसलागवडीला सुरुवात

सहकारी, खासगी साखर कारखाने यांना ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर-ट्रेलर, बैलगाडी यांना रिफ्लेक्टर बोर्ड व रिफ्लेक्टर टेप लावण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार या परिपत्रकांची प्रत विशेष लेखापरीक्षक वर्ग १ सहकारी संस्था (साखर) यांचे कार्यालय सदरबझार सातारा यांच्या कार्यालयात उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com