भारताच्या अति दारिद्र्यात १२.३ टक्क्यांची घट

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund) अलीकडील काळात प्रसारित झालेल्या अहवालानंतर जागतिक बँकेने आपला हा अहवाल प्रकाशित केला आहे.
Extreme poverty in India
Extreme poverty in IndiaAgrowon
Published on
Updated on

२०११ ते २०१९ दरम्यान भारतातील अति दारिद्र्यात १२ टक्क्यांनी घट झाली असल्याचे जागतिक बँकेच्या (World Bank) अहवालात नमूद करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund) अलीकडील काळात प्रसारित झालेल्या अहवालानंतर जागतिक बँकेने आपला हा अहवाल प्रकाशित केला आहे. या दोन्ही अहवालात जगातील दारिद्र्यनिर्मूलनावर (Poverty Reduction) भर देण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund) अहवालात कोरोना महामारीपूर्वीच्या दारिद्र्य आणि त्याच्या निर्मूलनासाठी झालेल्या प्रयत्नांवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. तर जागतिक बँकेच्या अहवालात कोरोना महामारीच्या काळात करण्यात आलेल्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली आहे.

Extreme poverty in India
हे वर्ष खाद्यान्न महागाईचेच !

सुतीर्थ सिन्हा रॉय आणि रॉय व्हॅन डेर वायडी यांनी हा अहवाल लिहिला आहे. ‘Poverty in India Has Declined over the Last Decade But Not As Much As Previously Thought’ असे या अहवालाचे शिर्षक आहे.

२०१९ साली कोरोनापूर्वी अति दारिद्र्याचे प्रमाण ०.८ टक्क्यांवर होते. २०२० साली कोरोनाचा कहर कायम असतानाही हे प्रमाण वाढले नाही. या वर्गातील शेवटच्या घटकापर्यंत खाद्यान्न पोहचवण्यात आल्यामुळे हे शक्य झाल्याचे या अहवालात जागतिक बँकेने नमूद केले आहे.

दिवसाला ज्यांचे उत्पन्न १४४.४० रुपयांपेक्षा कमी आहे, अशा लोकांच्या संख्येवरून अति दारिद्र्याचे प्रमाण मोजण्यात येते. २०१९ साली भारतातील अति दारिद्र्याचे प्रमाण १०.२ टक्के आढळले. २०११ च्या तुलनेत त्यात २२.५ टक्क्यांनी घट झाल्याचा आपला अंदाज असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

Extreme poverty in India
यंदा देशात गव्हाचे विक्रमी उत्पादन होणार!

२०११-२०१९ दरम्यान ग्रामीण भागातील दारिद्र्य २६.३ टक्क्यांवरून ११.६ टक्क्यांपर्यंत घटले आहे. २०११-२०१९ दरम्यान शहरी भागातील दारिद्र्य १४.२ टक्क्यांवरून ६. ३ टक्क्यांवर आले असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

२०११ नंतरच्या काळात भारतातील उपभोगातील विषमता (Consumption inequality) कमी होताना दिसते. मात्र २०१५ ते २०१९ दरम्यान तिच्यात लक्षणीय असा बदल झालेला नाही. कमी प्रमाणात जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. २०१३ ते २०१९ दरम्यानच्या काळात अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वार्षिक १० टक्क्यांची वाढ दिसून आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

असे असले तरीही या अहवालात नंतर नागरी भागातील दारिद्र्यात २०१६ साली २ टक्क्यांनी वाढ झाल्याचे नमूद केले आहे. याच वर्षी निमुद्रीकरणाचा (Demonetisation) निर्णय घेण्यात आला होता. ग्रामीण भागातील दारिद्र्यात थोडीशी वाढ झाली असल्याचे म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com