MLA Dr. Vishwajit Kadam : मानसिंग बँकेचा विस्तार जे. के. जाधवांच्या दूरदृष्टीमुळेच

MANSINGH BANK In Sangli : जे. के. बापू जाधव यांनी १ मे १९९७ रोजी मानसिंग बँकेची स्थापना ग्रामीण भागात केली. सहकारी संस्था व्यवस्थित चालत नाहीत.
MLA Dr. Vishwajit Kadam
MLA Dr. Vishwajit KadamAgrowon

Sangli News : जे. के. बापू जाधव यांनी १ मे १९९७ रोजी मानसिंग बँकेची स्थापना ग्रामीण भागात केली. सहकारी संस्था व्यवस्थित चालत नाहीत, त्या ठिकाणी बँकेची स्थापना केली. नुसती स्थापना करून ते थांबले नाहीत, तर बँकेचा विस्तार केला. हे त्यांच्यातील दूरदृष्टीपणामुळेच शक्य झाल्याचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले.

मानसिंग बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्ष सांगता समारंभात डॉ. कदम बोलत होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्ष सरोजमाई पाटील, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, माजी आमदार मोहनराव कदम, मानसिंग बँकेचे संस्थापक जे. के. जाधव यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम झाले.

श्री. कदम म्हणाले, की डॉ. पतंगराव कदम व जे. के. जाधव यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. डॉ. कदम यांच्या अकाली निधनानंतर त्यांनीच घरच्या वरिष्ठ सदस्याप्रमाणे मार्गदर्शन केले. जाधव यांची कामाची वृत्ती तरुणाला लाजवेल अशी आहे.

MLA Dr. Vishwajit Kadam
Solapur District Bank : सोलापूर जिल्हा बँकेच्या प्रशासकाला पुन्हा अकरा महिन्यांची मुदतवाढ

सरोजमाई म्हणाल्या, की एखाद्या शाळेत जसा एखादा शिक्षक चांगला असला, की त्या शाळेचे नाव सर्वत्र होते, तसे जे. के. जाधव यांच्या कुशल नेतृत्वामुळे आज बँकेचे नाव महाराष्ट्रभर गेले आहे. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, जयप्रकाश बावीस्कर, समित कदम, शिवाजीराव कदम यांनी मनोगत व्यक्त केले.

बँकेचे अध्यक्ष सुधीर जाधव यांनी स्वागत केले. बँकेचे संस्थापक जे. के. जाधव यांनी प्रास्ताविक केले. संचालक हनीफ मुजावर यांनी आभार मानले.

माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, सरोज एन. डी. पाटील, अजितराव घोरपडे, जयप्रकाश बावीस्कर, समित कदम, अनिल देसाई, एम. बी. शेख, महेंद्र लाड, शिवाजीराव नाईक, आमदार मोहनराव कदम, दशरथ माने, डॉ. शिवाजीराव कदम, मानसिंग बँकेचे संस्थापक जे. के. जाधव, अध्यक्ष सुधीर जाधव, उपाध्यक्ष दौलतराव लोखंडे, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, मीनाक्षीदेवी क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष क्रांतिकुमार जाधव, गौरव नायकवडी, निर्मला जाधव, संपत पाटील, नाथा पाटील, गणपतराव सावंत, शिवाजीराजे जाधव, जनरल मॅनेजर संभाजी जाधव, हनमंत महाडिक यांच्यासह संचालक, कर्मचारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com