Raigad News: यंदाच्या लांबलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. त्यामुळे या नुकसानीची थोडीफार भरपाई करण्यासाठी रायगड जिल्ह्यात आता कडधान्य लागवडीची लगबग सुरू आहे. जिल्ह्यातील शेतकरी ऑक्टोबर महिन्यांनतर कडधान्यांच्या लागवडीला अधिक प्राधान्य देतात, मात्र पावसाचा मुक्काम लांबल्याने शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. सुमारे १३ हजार ७५० हेक्टरवर कडधान्य, तर तीन हजार ५०० हेक्टरवर भाजीपाला लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे..जिल्ह्यात मुख्यत्वेकरून वाल, हरभरा, मूग व मटकी यासारख्या कडधान्यांचे पीक घेतले जाते. अलिबाग, महाड, माणगाव, पोलादपूर या तालुक्यांमध्ये कडधान्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पावसामुळे खरीप हंगामात झालेल्या नुकसानीनंतर आता रब्बी हंगामातील कडधान्य लागवडीवरही संकट आले आहे. खरीप हंगामातील भातशेतीचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत आणि आता त्यांना कडधान्य लागवडीच्या नियोजनातही अडचणी येत आहेत..PM Dhan Dhan Yojana: ‘धनधान्य, कडधान्य’ योजना भाग्य बदलतील : मोदी.गावठी वालांना पसंतीअलिबागमध्ये गावठी वालाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. हे वाल टपोरे आणि रुचकर असतात. या गावठी वालांच्या शेंगांची चव आणि सुगंध खास असतो. त्यामुळे या वालांना अलिबागच्या प्रसिद्ध अशा ‘पोपटी पार्टी’साठी मोठी पसंती असते.यंदा पाऊस लांबल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या आर्थिक नियोजनावरही झाला आहे. त्यामुळे सरकारकडे मदतीची मागणी करूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाचआली आहे..भात पिकांच्या नुकसानीनंतर तरी कडधान्य लागवड करून आर्थिक नियोजन सांभाळण्याची कसरत चालू असतानाच जमीन ओलसर असल्यामुळे ही कडधान्य लागवडीमध्ये अनेक अडचणी येणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यातच भात झोडपणीची कामे अजून शिल्लक असल्याने शेतकऱ्यांवरदुहेरी संकट ओढवल्याचेही चित्र दिसून येत आहे..जमिनीमध्ये ओलावासध्या जमिनीत ओलावा असल्याने कडधान्याची पेरणी करण्यासाठी योग्य नाही. त्यामुळे बी कुजण्याची भीती आहे. रायगड जिल्ह्यातील वाल, मटकी, हरभरा या कडधान्यांना इतर जिल्ह्यातही मोठी मागणी असते. त्यामुळे भातशेतीनंतर येथील शेतकरी कडधान्य लागवडीला प्राधान्य देतात..CACP Commission : कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या केंद्र सरकारला शिफारशी; तेलबिया, कडधान्य आयातीला ब्रेक लावा, खत टंचाई, वन्यप्राण्यांचा त्रास आणि सिंचनाकडे आयोगाने वेधलं लक्ष .भातकापणी अर्धवटऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून कडधान्याच्या शेतीला सुरुवात होते. सध्या भातकापणी आणि त्यानंतर झोडणीचे काम सुरू आहे. अलिबाग तालुक्यातील खाडीभाग आणि डोंगराळ परिसरात शेती केली जाते. या भागातील भातकापणीचे काम केवळ २५ टक्के पूर्ण झाले आहे..गावठी भाज्यांचे प्रमाण अधिकजिल्ह्यात पालक, मेथी, कोथिंबीर, मुळा, गाजर, बीट, फुलकोबी, वांगी, टोमॅटो आणि काकडी यांसह इतर भाज्यांचा समावेश आहे..मुख्यतः अलिबाग, पेण, महाड, गोरेगाव या ठिकाणी या गावठी भाज्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.पोपटी पार्टीसाठी अलिबागच्या वालांना मोठी मागणी असते, मात्र यंदा या लागवडीवरही परिणाम होणार आहे..ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस लांबल्याने अद्यापही भातकापणीची कामे पूर्ण झालेली नाहीत. जमीन ओली आहे. त्यामुळे कडधान्य पेरणी करण्यात अडथळे आहेत, मात्र शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करावा. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.- वंदना शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी अधीक्षक, रायगड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.