
Sangli News : गेल्या तीन पिढ्या पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या जत तालुक्याच्या पूर्व भागाला या वर्षाअखेर पाणी देण्यासाठी विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
सद्यःस्थितीत ३६ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित २१ किलोमीटरचे काम सुरू आहे. तर मिरज तालुक्यातील बेडग येथे पंपहाऊसचेही काम सुरू झाले आहे. त्यामुळे कृष्णा अवतरण्याची प्रतीक्षा दुष्काळी भागातील शेतकरी करू लागला आहे.
जत तालुका दुष्काळी भाग, पाण्याविना बहुतांश शेती पडून, तालुक्यातील तीन पिढ्यांनी पाण्यासाठी टाहो फोडला. अनेक वेळा आंदोलनेही झाली. प्रत्येक निवडणुकीत म्हैसाळचे पाणी देऊ, अशी आश्वासनेही दिली. मात्र, पाणी मिळाले नाही. दोन वर्षांपूर्वी शेती मूळ म्हैसाळ योजनेत समावेश नसलेली आणि जगण्याचा संघर्ष करणारी जत पूर्व
भागातील ६५ गावे पाण्यासाठी आक्रमक
झाली होती. पाणी मिळणार नसेल तर कर्नाटक राज्यात जाऊ द्या, अशी या गावांनी मागणी करत राज्यात हल्लकल्लोळ माजवून दिला होता. डिसेंबर २०२२ मध्ये विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला सुप्रमा अहवालास मान्यता मिळाली होतीया योजनेचा खर्च २९०० कोटी आहे.
त्यापैकी १०२८ कोटींच्या टेंडरचे काम प्रगतिपथावर आहे. उर्वरित ९७९ कोटींची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ५५० कोटी मार्च अखेर मिळणार आहे. विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेचे अंतर ५७ किलोमीटर आहे. गेल्या वर्षापासून विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम सुरू झाले.
एकाचवेळी आरग, बेडग, लोणारवाडी आणि येळदरी अशा तीन ठिकाणी कामाला सुरुवात झाली आहे. बेडगपासून कुडणूरपर्यंत १७०० व्यासाची दुहेरी पाइपलाइन असणार आहे. तिथून पुढेही साडे पाच फुटांच्या लोखंडी दुहेरी पाइपलाइन टाकण्यात येणार आहेत.
बेडग येथे पंप हाऊसचे काम सुरू झाले आहे. आजअखेर ३६ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६५ गावांतील १ लाख ३ हजार ९२१ हेक्टर लाभ क्षेत्र आहे. त्यापैकी सिंचनाखाली २६ हजार ५०० हेक्टर येणार आहे. या वर्षाअखेर हे काम पूर्ण करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले असून योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या वर्षाअखेर कृष्णेचे पाणी येण्याची दुष्काळी पट्ट्यात शेतकरी करू लागला आहे.
बंधारे, प्रकल्प भरण्याचे नियोजन
जत पूर्व भागात दोन मध्यम, ३५ लघू प्रकल्प आहेत. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे १४३, तर पाझर तलाव २२ असे एकूण २०२ तलावांची संख्या आहे. या तलावांत ४०१५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा साठवण क्षमता आहे. विस्तारित म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून २०२ तलाव भरून देण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.