
Yavatmal News : जमीन आणि हवामान पोषक असल्याने पुसदसह महागाव, उमरखेड, दिग्रस या चार तालुक्यांत निर्यातक्षम केळी पिकाचे क्लस्टर तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे. तंत्रज्ञान व संशोधन तसेच इतर सुविधा देण्यासाठी प्रशासन तुमच्या पाठीशी राहील.
केळीच्या उत्पादन व निर्यातीमधूनच शेतकऱ्यांची स्वतःची प्रगती होईल व जिल्हा समृद्ध होईल, असे विचार जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी व्यक्त केले. पुसद येथील प्रगतिशील शेतकरी प्रतापराव पतंगे, शरद देशमुख व समीर चिद्दरवार यांनी व्यापारी भवनात आयोजित केलेल्या निर्यातक्षम केळी पिकावरील मार्गदर्शन सभेत जिल्हाधिकारी बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी आशिष बीजवल, उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तहसीलदार महादेव जोरवर, गटविकास अधिकारी संजय राठोड, तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे व केळी पीक तज्ज्ञ सागर कोपर्डेकर उपस्थित होते. समीर चक्करवार, प्रतापराव पतंगे, शरद देशमुख यांनी आयोजित केलेल्या शिबिरात सागर कोपर्डेकर यांनी निर्यातक्षम केळीच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण धडे दिले.
शेती रस्ते, पाणंद रस्ते मोकळे करणार
शेतकऱ्यांच्या मार्गदर्शन शिबिरात शेती रस्ते व पाणंद रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यावर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी, शेती रस्ते व पानंद रस्ते बांधण्यावर तसेच अतिक्रमणमुक्त करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.
शेतीमालाच्या वाहतुकीसाठी वहिवाट मिळू शकत नाही, हे खरे आहे. त्यामुळे नरेगा व डीपीसीमधून ही कामे करण्यात येतील. त्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, ग्रामसभेतून ठराव करून पाठवावा, पावसाळ्यापूर्वी ही कामे करता येतील, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.