Stray Cow : त्रासामुळे मोकाट गायींना खाऊ घातली स्फोटके

Animal Care : गोवंश हत्या बंदीनंतर भाकड गायींचा सांभाळ करू न शकल्याने अनेक गायी मोकाट सोडण्यात आल्या आहेत.
Stray Cow
Stray CowAgrowon
Published on
Updated on

Pune News : गोवंश हत्या बंदीनंतर भाकड गायींचा सांभाळ करू न शकल्याने अनेक गायी मोकाट सोडण्यात आल्या आहेत. या गायींच्या त्रास उच्चभ्रू नागरिकांना होऊ लागल्याने मोकाट गायींना स्फोटके खाऊ घालून मारण्याचा संतापजनक प्रकार हिंजवडी परिसरात उघड झाला आहे.

या घटनेत जबडा फुटलेल्या अवस्थेतील जायबंदी गायीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत गोपालकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेची पशुसंवर्धन विभागाने हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार देऊन चौकशीची मागणी केली आहे.

Stray Cow
Animal Care : गाई, म्हशींचे आरोग्य टिकूण राहण्यासाठी युरोमोल चाटण वीट

या बाबतची माहिती गोपालक विक्रम मुरकुटे यांनी दिली. मुरकुटे म्हणाले,‘‘हिंजवडी, कासारसाई परिसरात अनेक गायी मोकाट सोडल्या आहेत. चरण्यासाठी या गायी डोंगर परिसराबरोबरच सोसायट्यांचा परिसरात फिरत आहेत. तीन दिवसांपूर्वी जबडा फुटलेल्या गाय आढळली. या जायबंदी गायीला मी माझ्या गोठ्यावर नेले.

Stray Cow
Animal Care : जनावरांमध्ये अखाद्य वस्तूंमुळे होणारे अपाय

आणि पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांना उपचारासाठी बोलविले. डॉ. परिहार यांनी अथक प्रयत्न करून गायीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्यातरी स्फोटकांमुळे गायीचा पूर्ण जबडा आणि जीभ जळाल्यामुळे गाय पाणी देखील पिऊ शकत नव्हती. तीन दिवसांच्या प्रयत्नानंतर अखेर गायीचा बुधवारी (ता.६) मृत्यू झाला. अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिस आणि पशुसंवर्धन विभागाने काळजी घेण्याची गरज आहे.’’

याबाबत पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार म्हणाले,‘‘या गंभीर घटनेबाबत आम्ही हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हिंजवडी परिसरातील मोकाट पशुधनाबाबत काही दिवसांपासून हिंसक घटना घडत आहेत. मालमत्तेला हानी पोहचण्याच्या भीतीने पशुधनाला स्फोटके खाऊ घालण्याचे प्रकार होत आहेत. प्राणी क्लेश प्रतिबंध कायद्यानुसार याचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करावी.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com