International Sea World Aquarium Abu Dhabi : अबूधाबी येथील आंतरराष्ट्रीय ‘सी वर्ल्ड’ मत्स्यालय

Abu Dhabi Aquarium : अरबी आखात हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. अबूधाबी येथील ‘सी वर्ल्ड’मध्ये रिसर्च अॅण्ड रेस्क्यू सेंटरमध्ये सागरी संशोधन केले जाते. या ठिकाणी आखातीतील सागरी परिसंस्थेतील सूक्ष्मजीवांपासून ते मोठ्या माशांचे संवर्धन केले जाते.
International Sea World Aquarium Abu Dhabi
International Sea World Aquarium Abu Dhabi Agrowon
Published on
Updated on

डॉ. विवेक वर्तक

शेती देशोदेशीची

Abroad Agriculture : अरबी आखात हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. अबूधाबी येथील ‘सी वर्ल्ड’मध्ये रिसर्च अॅण्ड रेस्क्यू सेंटरमध्ये सागरी संशोधन केले जाते. या ठिकाणी आखातीतील सागरी परिसंस्थेतील सूक्ष्मजीवांपासून ते मोठ्या माशांचे संवर्धन केले जाते. समुद्रीजीवांच्या संवर्धनासाठी नावीन्यपूर्ण पद्धत विकसित करण्यात येत आहेत. जगप्रसिद्ध मत्स्यालयात समुद्रातील विविध जातींचे मासे पहावयास मिळतात.

अबूधाबीतील ‘सी वर्ल्ड अॅक्वेरियम’ हे जगातील सर्वांत मोठे मत्स्यालय आहे. या ठिकाणी आठ वेगवेगळे विभाग असून, प्रत्येक विभागाची एक वेगळी ओळख आहे. मत्स्यालयामध्ये मोठ्या काचांच्या टाक्यांमध्ये शार्क, डॉल्फिन आणि रंगीबेरंगी प्रवाळ आहेत. प्रत्येक टाकीच्या बाजूला त्या समुद्री जिवांबद्दल माहिती दिलेली आहे. सागरी किनाऱ्यांच्या आसपास असलेले पक्षी, प्राणी आणि फ्लेमिंगो या मत्स्यालयामध्ये विहारताना दिसतात. त्यांच्यासाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती करण्यात आली आहे.

International Sea World Aquarium Abu Dhabi
Aquarium Business: तंत्र शोभिवंत मत्स्यालय निर्मितीचे

मत्स्यालयामध्ये शार्क टनेल पाहताना आपण समुद्राच्या तळाशी उभे आहोत आणि सभोवती मोठे शार्क आणि स्टिंग रे पोहत आहेत, अशी अनुभूती येते. इथे विविध प्रकारचे शार्क, स्टिंग रे आणि मोठे समुद्री मासे अगदी जवळून पाहता येतात. मोठ्या काचेच्या भिंतींमुळे जणू आपण खोल समुद्रात चालत असल्याचा भास होतो. विविध जातींच्या माशांच्या हालचाली, स्वभाव आणि खाद्यसाखळी यांचे निरीक्षण करताना त्यांची सागरी परिसंस्थेमधील भूमिका अधिक स्पष्टपणे समजते. डॉल्फिन शोमध्ये डॉल्फिन्सचे उड्या मारणे, बॉल खेळणे आणि प्रशिक्षकांच्या आज्ञा ऐकणे हे सर्व पाहताना पर्यटकांना मजा येते. समुद्रातील सिंह म्हणजेच सी लायन शो देखील मनोरंजक असतो. या सफरीदरम्यान समुद्राच्या गूढ आणि सुंदर दुनियेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो.


International Sea World Aquarium Abu Dhabi
International Flower Exhibition : आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन प्रदर्शनास उद्यापासून प्रारंभ

महाराष्ट्रामध्येही मत्स्यालयाची संधी ः
अबूधाबी प्रमाणेच महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीवर ‘सी वर्ल्ड’ उभारण्यासाठी योग्य ठिकाणे आहेत. या माध्यमातून स्थानिक मासेमारी आणि मत्स्यपालन व्यवसायास चालना देण्यासाठी संशोधन व प्रशिक्षण केंद्राची जोड मिळवणे शक्य आहे. पर्यटकांसाठी आधुनिक मत्स्यालयामध्ये सागरी जीवनाचा अनुभव आणि शैक्षणिक कार्यक्रम राबविता येतील. जैवविविधतेच्या संवर्धनासाठी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक झाले आहे. योग्य नियोजन, तंत्रज्ञान, सरकारी आणि खासगी क्षेत्राचे सहकार्य मिळाल्यास, महाराष्ट्रातही असेच एक जागतिक दर्जाचे सागरी संशोधन व पर्यटन केंद्र उभारता येणे शक्य आहे.


पाचशेहून अधिक प्रजातींचे संवर्धन ः
‘सी वर्ल्ड’ मत्स्यालयामध्ये विविध प्रकारच्या सागरी प्रजातींसाठी वेगवेगळ्या वातावरणात अनुकूल टाक्या तयार करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी पाचशेहून अधिक प्रजाती आणि ६८,००० हून अधिक सागरी जीव आहेत. प्रत्येक टाकीतील तापमान, मिठाचे प्रमाण आणि पाण्याचा प्रवाह अत्यंत सुयोग्य पद्धतीने ठेवण्यात आला आहे. येथील स्वच्छता आणि शिस्तबद्धता वाखाणण्याजोगी आहे.

मत्स्यालयामध्ये पाणी गाळण पद्धती आणि पाण्याचा पुनर्वापर तंत्रज्ञान, अत्याधुनिक ऑक्सिजन पुरवठा आणि तापमान नियंत्रण प्रणाली अत्यंत प्रगत आहे. याठिकाणी सागरी जिवांसाठी नैसर्गिक अधिवासासारखी प्रतिकृती निर्माण करण्यात आली आहे. विविध समुद्री प्रजातींच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी विशेष संशोधन आणि व्यवस्थापन केंद्र कार्यरत आहे. येथील व्हर्च्युअल समुद्र सफरीमध्ये आपण समुद्रामध्ये ऑक्सिजन न लावता फिरत आहोत असा समुद्र विश्‍वाचा जिवंत अनुभव ‘फोर डी’ तंत्रज्ञानाने मिळतो.

रिसर्च अॅण्ड रेस्क्यू सेंटर ः
अरबी आखात हे भौतिक परिस्थितींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. अबूधाबी येथील ‘सी वर्ल्ड’मध्ये रिसर्च अॅण्ड रेस्क्यू सेंटरमध्ये सागरी संशोधन केले जाते. या ठिकाणी आखातीतील सागरी परिसंस्थेतील सूक्ष्मजिवांपासून ते मेगाफोनापर्यंतच्या विशिष्ट वैशिष्ट्यांची तपासणी केली जाते. त्यांच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण पद्धती विकसित करण्यात येत आहेत. संयुक्त अरब अमिरात सरकारच्या मदतीने येथील संशोधन केंद्र सागरी संपत्तीच्या संवर्धनामध्ये येणारे धोके आणि एकूण आरोग्य स्थितीचे मूल्यांकन करण्याचे काम करते. या संशोधन केंद्राला विशेष क्षेत्र आणि प्रयोगशाळा उपकरणे, अत्याधुनिक मत्स्यपालन सुविधा आणि संशोधनासाठी एक जहाज उपलब्ध करून देण्यात आले आहे. वाढते तापमान, वाढती क्षारता, प्लॅस्टिक प्रदूषण हे सागरी जीवांसाठी धोकादायक ठरत आहेत. याबाबतही विशेष संशोधन या केंद्राच्या माध्यमातून सुरू आहे.

समुद्री प्रजातींच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी सुसज्ज संशोधन व व्यवस्थापन केंद्र कार्यरत आहे.
सागरी पर्यावरण संशोधनामध्ये समुद्रातील गवताचे कुरण आणि खडक तसेच माशांच्या अधिवासांचा ऱ्हास कमी करण्यासाठी नावीन्यपूर्ण पद्धती विकसित करण्यात येत आहेत. या संदर्भात अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये चाचण्या घेतल्या जातात. संशोधन आणि विविध सुविधा असलेली प्रयोगशाळा ‘सी वर्ल्ड’च्या मध्यावर वसली असून येथील आधुनिक उपकरणे सर्वसामान्य जनतेला काचेतून पाहता येतात.

‘फ्रोजन ओशन’ची निर्मिती ः
‘सी वर्ल्ड’मधील महत्त्वाचे आकर्षण म्हणजे ‘फ्रोजन ओशन’. या विभागात अंटार्क्टिका प्रदेशातील प्रजातींचे नैसर्गिक अधिवासानुसार व्यवस्थापन करण्यात आले आहे. यामध्ये कृत्रिम वातावरण, बर्फनिर्मिती आणि त्यांच्या अन्नपुरवठ्याचे व्यवस्थापन अत्यंत कौशल्याने केले जाते. ध्रुवीय महासागरातील आर्क्टिक प्रदेशासारख्या थंड वातावरणाची निर्मितीकरून या ठिकाणी डॉल्फिन, सी लायन, सील, वॉलरस यांचे संगोपन करण्यात आले आहे. या क्षेत्रात आर्क्टिक प्रदेशातील हंगामी तापमान आणि प्रकाश चक्र अनुभवता येते. येथे एका संशोधन जहाजावर जाऊन तेथील संशोधन संसाधने पाहता येतात.
---------------------------------------------------------
संपर्क ः डॉ. विवेक वर्तक, ९८२१९०५३५१
(मत्स्य शास्त्रज्ञ, मत्स्य उपकेंद्र, तारपोरेवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, पनवेल, जि. रायगड)
 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com