थोडक्यात माहिती...१. योग्य वाणाची निवड, संतुलित खत व्यवस्थापन आणि जैविक औषधांचा वापर केल्यास कांद्याची टिकवणक्षमता वाढते.२. काढणीनंतर कांद्याला सावलीत १५ दिवस व्यवस्थित सुकवून साठवणुकीसाठी तयार करावे.३. पारंपरिक कांदा चाळी व आधुनिक नियंत्रित तापमान पद्धतीमुळे साठवणीदरम्यान नुकसान कमी होते.४. राज्य सरकारकडून कांदा चाळीसाठी प्रति मेट्रीक टन ₹४००० अनुदान उपलब्ध आहे.५. खराब कांदे वेळेवर वेगळे काढून चाळ स्वच्छ व हवेशीर ठेवणे गरजेचे आहे..Onion Farming Tips: कांदा हा वर्षभर लागणारी फळभाजी आहे. महाराष्ट्रात रब्बी हंगामात उत्पादन कांद्याचे ६० टक्के घेतले जाते. त्यामुळे या हंगामातील काढलेला कांदा एप्रिलपासून साठवलेला असतो. संततधार पाऊस आणि जास्त आद्रता यांमुळे सध्या राज्यातील बऱ्याच भागांमध्ये साठवलेला कांदा खराब होतो आहे. त्यामुळे कांद्याच्या योग्य वाणाची निवड, अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन आणि योग्य प्रकारे साठवण केल्यास कांद्याची नासाडी टाळता येऊ शकते. या लेखासाठी कांदा व लसूण संशोधन संस्थान येथील शास्त्रज्ञ डॉ. काळे यांनी मार्गदर्शन केले आहे. .काढणीपूर्वीचे उपायकांद्याची चांगली टिकवणक्षमता मिळण्यासाठी उच्च गुणवत्तेच्या बिया म्हणजेच योग्य वाण वापरण्याची आवश्यकता असते. संतुलित प्रमाणात खते द्यावीत आणि विशेषतः पोटॅशचे प्रमाण जास्त ठेवावे, कारण यामुळे कांद्याची साठवणक्षमता वाढते. पाण्याचा वापर करताना अतिक्षारयुक्त पाणी देणे टाळावे, कारण त्याने कांदा लवकर खराब होतो. तसेच रासायनिक औषधांचा अतिरेक टाळून जैविक औषधांवर भर द्यावा. काढणी योग्य वेळी करावी, जेव्हा अर्ध्यापेक्षा जास्त पात वाळतात आणि पात्याची मान खाली झुकते तेव्हा काढणी उत्तम मानली जाते..Onion Storage Management: कांदा साठवणुकीचे सुधारित तंत्र.काढणीनंतरचे उपायकाढणीनंतर कांद्याला ४-५ दिवस शेतातच सुकवावे आणि नंतर सावलीत १५ दिवस व्यवस्थित सुकवून साठवणुकीसाठी तयार करावे. मान कापताना ती २ सें.मी. वरून बारीक कापावी. साठवणीसाठी मोकळी, वाहती हवा असलेली जागा निवडावी आणि कांदा चाळ निर्जंतुक करून घ्यावी. खराब कांदे वेळीच वेगळे काढावेत कारण ते चांगल्या कांद्यांवर परिणाम करतात. कांदे चाळीत रचताना खालचे कांदे वर आणि वरचे कांदे खाली करुन भरावेत. या कांदा चाळीची उंची ४ फुटापेक्षा जास्त नसावी. प्रामुख्याने या चाळीमध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी..कांदा चाळींसाठी अनुदानकांदा साठवण्यासाठीच्या पारंपरिक कांदा चाळींसाठी राज्यशासन अनुदान देते. चार हजार रुपये प्रती मेट्रीक टन या प्रमाणाने राज्य सरकार कांदा चाळींसाठी शेतकऱ्यांना अनुदान देते. ह्या चाळीची रचना कांदा व लसूण संशोधन संस्थान आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिलेल्या रचनेप्रमाणे करावी. केवळ याच रचनेसाठी राज्यसरकार अनुदान देते. त्यामुळे शेतकऱ्यांनी चाळीची बांधणी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनीच करावी. .आधुनिक पद्धतीकांदा साठवण्यासाठी पारंपरिक चाळींसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही फायदेशीर आहे. कंट्रोल्ड अॅट्मॉस्फेरिक ओनियन स्टोरेज म्हणजेच नियंत्रित तापमान कांदा साठवण पद्धतीत २७°C तापमान आणि ६०-६५% आद्रता कायम ठेवली जाते, तसेच एअर सर्क्युलेशन सिस्टमद्वारे हवा खेळती ठेवली जाते. या तंत्रज्ञानामुळे कांद्याचे नुकसान अत्यल्प होते. त्याशिवाय शीतगृह (Cold Storage) सुद्धा एक चांगला पर्याय आहे. येथे ०°C तापमान आणि ६५-७०% आद्रता ठेवल्यास सहा महिन्यांनंतर फक्त ५% पर्यंतच नुकसान होते..नुकसान टाळण्यासाठी महत्त्वाचे सल्लेयोग्य वाण निवडणे (उदा. एन-२-४-१, भीमा किरण, भीमा शक्ती).संतुलित खत व्यवस्थापन, विशेषतः नत्राचे प्रमाण नियंत्रित ठेवणे.योग्य वेळी काढणी आणि योग्य प्रकारे सुकवणे.खेळती हवा, नियंत्रित आर्द्रता आणि योग्य पॅकिंग (ज्यूट, जाळीदार पिशव्या) वापरणे.खराब कांदे वेळोवेळी वेगळे काढून चाळ स्वच्छ ठेवणे..वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):१. कांद्याची टिकवणक्षमता वाढवण्यासाठी काय करावे? योग्य वाण, संतुलित खत व्यवस्थापन आणि पोटॅशयुक्त खते वापरणे आवश्यक आहे.२. काढणीनंतर कांद्याची साठवण कशी करावी? कांद्याला ४-५ दिवस शेतात व नंतर १५ दिवस सावलीत सुकवून चाळीत साठवावे.३. कांदा चाळीसाठी शासन अनुदान किती आहे? राज्य सरकार ₹४००० प्रति मेट्रीक टन प्रमाणे कांदा चाळीसाठी अनुदान देते.४. आधुनिक कांदा साठवणीच्या पद्धती कोणत्या आहेत? कंट्रोल्ड अॅट्मॉस्फेरिक स्टोरेज व कोल्ड स्टोरेज पद्धतीत नुकसान अत्यल्प होते.५. कांदा खराब होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी? खेळती हवा ठेवणे, आर्द्रता नियंत्रित ठेवणे, जाळीदार पिशव्या वापरणे आणि खराब कांदे वेळेवर वेगळे काढणे आवश्यक आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.