Nagpur News: वाशिम जिल्ह्यात चांगला परतावा देणाऱ्या चिया पिकाच्या यशानंतर नागपूर जिल्ह्यातही या पिकाला कृषी विभागाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या क्षेत्र विस्तार उपक्रमांतर्गत मौदा तालुक्यातील मारोडी परिसरात चिया पिकाखाली तब्बल १२ एकर क्षेत्र विकसित करण्यात आले आहे..कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमासाठी मारोडी येथील शेतकरी समूहाने पुढाकार घेतला असून वाशिम येथील श्रीकांत शिंदे यांच्या गटाकडून अनुदानावर बियाणे उपलब्ध करून घेण्यात आले. एकरी दोन किलो बियाण्याच्या प्रमाणात पेरणी करण्यात आली असून कृषी विभागाने शिफारस केलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. .Chia Farming: शेतकऱ्यांची ‘चिया’ला पसंती.योग्य व्यवस्थापन केल्यास चिया पिकापासून एकरी चार ते पाच क्विंटल उत्पादन मिळू शकते. मात्र पहिल्यांदाच लागवड केल्याने यंदा सरासरी एकरी तीन क्विंटल उत्पादन अपेक्षित असल्याचे शेतकरी सांगतात..वाशिम जिल्ह्यात चिया पिकाखालील क्षेत्र वाढल्यामुळे या पिकासाठी स्वतंत्र बाजारपेठ विकसित झाली असून सध्या चियाला प्रतिक्विंटल सुमारे २२ हजार रुपयांचा दर मिळत आहे. सरासरी २० हजार रुपये दर गृहीत धरून आणि तीन क्विंटल उत्पादन झाल्यास शेतकऱ्यांना एकरी सुमारे ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे..Chia Seed Farming: हरभऱ्याला पर्याय चिया सीड्स !.त्यामुळे कमी खर्चात जास्त नफा देणारे पीक म्हणून चिया शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे आणि अनुदानित बियाण्यांच्या उपलब्धतेमुळे नागपूर जिल्ह्यात चिया पिकाचा विस्तार वेगाने होत असून भविष्यात हे पीक अनेक शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा स्थिर स्रोत ठरण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे..“वाशिममध्ये चिया पिकातून शेतकऱ्यांना चांगला लाभ होत असल्याचे पाहून आम्हीही प्रायोगिक तत्त्वावर १२ एकरांवर लागवड केली आहे. बाजारात चांगला दर मिळत असून उत्पन्नाची नवी संधी निर्माण झाली आहे,”-प्रवीण देशमुख, शेतकरी, मारोडी (ता. मौदा, जि. नागपूर)..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.