Amravati News: पश्चिम विदर्भात पाच जिल्ह्यांत जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्येही अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अमरावती विभागात सुमारे साडेआठ लाख हेक्टर क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाल्याचे सर्व्हेक्षणाअंती समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची मागणी होत आहे. .अतिवृष्टीने सर्वाधिक नुकसान बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यात झाले आहे. पावसामुळे सोयाबीन, कापूस, तुरीसह मका, उडीद, मूग व फळबागांना फटका बसला आहे. भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे विभागातील आठ लाख ३८ हजार ७२९ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याचा अहवाल विभागीय आयुक्तालयाने दिला आहे..Heavy Rain western Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रात संततधार; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला.पुरामुळे ८१२ हेक्टर व गाळ साचल्याने ४६ हेक्टर शेतजमीन नापेर झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील तीन लाख तीन हजार हेक्टर क्षेत्रातील पिके नष्ट झाली असून त्याखालोखाल यवतमाळ तीन लाख ६५३, वाशीम एक लाख ७४ हजार ४४७ व अमरावती जिल्ह्यातील ५६ हजार ७१ हेक्टरमधील पिकांना फटका बसला आहे. अकोला जिल्ह्यात तुलनेने कमी नुकसान झाले असून तीन हजार ७९० हेक्टरमधील पिके बाधित झाल्याचे विभागीय आयुक्तांच्या अहवालात नमूद आहे. जिल्हानिहाय मृत व्यक्ती अमरावती ः १४, अकोला ः ५, यवतमाळ ः १६, बुलडाणा ः १२, वाशीम ः ७ ः एकूण ः ५४ .पाऊस व संबंधित घटनांमुळे ५४ बळी जून ते १८ सप्टेंबर, या कालावधीतील पावसाबरोबरच वीज कोसळल्याने, पुरात वाहून गेल्याने व अपघाताने अमरावती विभागातील ५४ जणांचा जीव गेला आहे. सर्वाधिक १६ जणांचा मृत्यू यवतमाळ जिल्ह्यात झाले असून वाशीममध्ये सात जणांचा जीव गेला आहे. शासनाने यापैकी ३१ प्रकरणांत शासकीय मदत दिली असून २२ प्रकरणे प्रलंबित आहेत. .Heavy Rain western Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रात संततधार; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला.जिल्हानिहाय शेतीचे नुकसान (हेक्टरमध्ये)जिल्हा क्षेत्र अमरावती ५६,०७१ अकोला ३७९० यवतमाळ ३,००,६५३ वाशीम १,७४,४४७ बुलडाणा ३,०३,७६८ एकूण ८,३८,७२९ .सरासरी ११२ टक्के पाऊस अमरावती विभागात सरासरीच्या तुलनेत ११२ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे विभागातील ३६ तालुके व तीन हजार ३१८ गावे बाधित झाली आहेत. यापैकी अमरावती जिल्ह्यात ८६ टक्के पावसाची सरासरी आहे. ती इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे, तर चार जिल्ह्यांनी सरासरी ओलांडली आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.