Heavy Rainfall: परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ओल्या दुष्काळाचे सावट
Crop Damage: परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत सततच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांमध्ये मूळकुज झाली आहे. सुपीक माती वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात घट आणि अन्नद्रव्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे.