Global Trade: युरोपियन युनियनने (ईयू) जनुकीय सुधारित घटक (जीएमओ) आढळल्याच्या कारणावरून चीनमधून आलेले तांदूळ पीठ स्वीकारण्यास नकार दिला. विशेष म्हणजे, याच वर्षाच्या सुरुवातीला चीनने भारतातून निर्यात झालेल्या बिगर-बासमती तांदळाच्या अनेक खेपा त्यात ‘जीएमओ’ असल्याचा आरोप करत परत पाठवल्या होत्या. भारतात व्यावसायिक स्तरावर जीएम तांदळाची लागवड होत नसतानाही चीनने हा प्रकार केला होता..युरोपियन युनियनच्या ‘रॅपिड अलर्ट सिस्टिम फॉर फूड अँड फीड’ने (आरएएसएफएफ) जारी केलेल्या सूचनेनुसार, नेदरलँड्समध्ये चीनमधून आलेल्या हायड्रोलाइज्ड तांदूळ पिठामध्ये जीएमओ घटक आढळले. .Farmers Income Growth: निर्यातीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात चांगली वाढ.ही खेप धान्य आणि बेकरी उत्पादनांसाठी युरोपमध्ये पाठविण्यात आली होती. तपासात ‘कॉलिफ्लॉवर मोझाईक व्हायरस’ आणि ‘नोपालाईन सिंथेज टर्मिनेटर’ या ‘जीएमओ’शी संबंधित जनुकीय घटकांची उपस्थिती चिनी तांदूळ पिठात आढळून आली..Green Urea : ग्रीन युरिया उत्पादनासाठी केंद्र सरकारच्या हालचाली; पहिला प्रात्यक्षिक प्रकल्प आंध्र प्रदेशमध्ये होणार.व्यापार क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, एकीकडे चीनच्या उत्पादनांमध्ये ‘जीएमओ’ आढळत असताना भारतावर याबाबत होणारे आरोप निराधार असल्याचे या घटनेतून स्पष्ट होते. यापूर्वी चीनने भारतातील सुमारे ७० बिगर-बासमती तांदूळ खेपा ‘जीएमओ’चे कारण देत नाकारल्या होत्या. त्यामुळे भारताविरुद्ध चीनने व्यापारयुद्ध छेडल्याचेही बोलले जात होते..निर्यातीत अडथळा : चीनमधील नानजिंग विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, २००६ पासून युरोपियन युनियनने चीनच्या तांदूळ-आधारित उत्पादनांमध्ये अनेकदा अनधिकृत ‘जीएमओ’ घटक आढळल्याची नोंद केली आहे. त्यामुळे युरोपला चीनकडून होणाऱ्या तांदूळ-आधारित उत्पादनांच्या निर्यातीपुढे हे मोठे तांत्रिक अडथळे ठरले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.