
Cashew Board News : गेल्या काही वर्षांपासून राज्यात काजू मंडळ स्थापन करण्याची मागणी उत्पादक शेतकऱ्यांकडून केली होत होती, त्याला आता मूर्त स्वरूप आले आहे. राज्यात काजू बोर्डाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच या मंडळाच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
राज्यात उत्पादित काजूचा स्वतंत्र ब्रँड तयार करून त्याला ‘जीआय’ मानांकन मिळवून देणे, काजूची निर्यात वाढवणे, देशांतर्गत काजू व्यापाराला चालना देणे, काजू प्रक्रिया उद्योग उभारणे यासह काजू उद्योगातून उपपदार्थ तयार करण्यासाठी या काजू मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
या मंडळाचे कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा व चंदगड तालुके असे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. नवी मुंबई येथे मंडळाचे मुख्यालय राहील, तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे विभागीय कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे. या मंडळाला 50 कोटी रुपयांचे भागभांडवल उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे कोकणात काजूचे उत्पादन वाढून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे.
या मंडळाच्या स्थापनेमुळे काजू उत्पादकांना दराची हमी दिली पाहिजे. काजू मंडळाने बाजारपेठेत उतरून काजूची खरेदी करणे, प्रक्रिया उद्योगांना त्याचा पुरवठा करणे आणि या सर्व साखळीत उत्पादकांना उत्पादन खर्चावर आधारित दर मिळण्याची हमी मंडळाने घेतली पाहिजे, अशी मागणी काजू उत्पादकांकडून होऊ लागली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.