डॉ.अतुल पाटणेअंडी साठवण खोलीतून फलित अंडी काढल्यानंतर लगेच इनक्यूबेटरमध्ये ठेवू नयेत. किमान १२ ते २४ तास अंडी बाहेर सामान्य घरातील तापमानाला ठेवावीत. इनक्यूबेटरच्या ट्रेमध्ये अंडी ठेवताना रुंद टोक वरच्या दिशेने करून अंड्यांची मांडणी करावी. इनक्यूबेटमधील तापमान, आर्द्रता, वायुविजन योग्य पद्धतीने ठेवावे..काही कुक्कुट व्यावसायिकांनी बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन स्वतः स्थानिक वातावरणातील पॅरेंट कोंबड्या विकसित करून फलित अंड्यांची निर्मिती करून त्याची विक्री करीत आहेत. काही व्यावसायिक अंडी उबवणी युनिटव्दारे ही फलित अंडी उबवणुकीसाठी ठेवून पिले तयार करून विकतात. फलित अंडीकोंबडी वयात आल्यानंतर (२० व्या आठवड्यांनंतर) कोंबडा आणि कोंबडी यांचा संकर झाल्यानंतर कोंबडीने जी अंडी घातली जातात त्यांना फलित अंडी म्हणतात. या अंड्यांना आवश्यक प्रमाणात ऊब देऊन त्यातून पिल्ले काढली जातात, म्हणून यांना उबवणुकीची अंडी देखील म्हणतात. .VNMKV Incubation Center : ‘वनामकृवि’तील कॉमन इनक्युबेशन सेंटर करार तत्त्वावर चालविणार.अंडी उबवणीफक्त फलित अंड्यातून यंत्राच्या साह्याने कृत्रिम पद्धतीने किंवा कोंबडीच्या खुडूकपणाद्वारे (नैसर्गिक पद्धतीने) २१ दिवसानंतर पिलू बाहेर काढले जाते त्यास अंडी उबवणे असे म्हणतात. फलित अंडी उत्पादनकोंबडीचे ठरावीक वय झाल्यानंतर अंडी घालणे हा तिचा नैसर्गिक गुणधर्म आहे. कळपामध्ये नर कोंबडा असो किंवा नसो कोंबड्या अंडी घालतातच. जर कळपामध्ये कोंबडा असेल तरच मात्र फलित अंडी कोंबडी देत असते. .कोंबडा आणि कोंबडी यांचा संकर झाल्याने फलित अंडी मिळत असतात. चांगल्या प्रमाणात फलित अंडी मिळावी यासाठी योग्य प्रमाणात म्हणजेच १० ते १२ मादी कोंबडीच्या मागे १ कोंबडा असावा. कोंबडा सुदृढ व निरोगी असावा, कोंबडा किमान दर एक वर्षांनी कळपातून बदलावा.नर आणि मादी संकरणाशिवाय मिळालेली अंडी म्हणजेच खाण्याची अंडी होय. ज्या कळपामध्ये कोंबडा नसतो तसेच पांढऱ्या लेयर कोंबड्यांपासून मिळणारी अंडी ही खाण्याची अंडी असतात त्यांना अफलीत अंडी म्हणतात. फलित अंडी देखील खाण्यास योग्यच असतात परंतु त्यांचा जास्त विक्री दर व कमी साठवण क्षमता तसेच त्यांचा उद्देश हा पिले काढण्याचा असतो त्यामुळे खाण्यास त्यांचा वापर जास्त होत नाही. दोन्ही अंड्यातील पोषकघटक हे सारख्याच प्रमाणात असतात..Spoiled Eggs : अंड खराब झालायं हे कसं ओळखाल? पाहा सोप्या टिप्स.फलित अंड्यांचे व्यवस्थापन पॅरेंट कोंबड्यांपासून योग्य प्रमाणात व उत्कृष्ट फलित अंडी मिळवून त्यापासून सुदृढ व निरोगी पिले मिळणे म्हणजे फलित अंड्यांचे उत्पादन व व्यवस्थापन उत्तम प्रकारे झाले असे म्हणता येईल. त्यासाठी विशिष्ट व्यवस्थापनाच्या काही बाबींचा अवलंब केला पाहिजे.जातीची निवडव्यवसायाच्या दृष्टीने उच्च उत्पादन क्षमता आणि चांगले फलित अंड्यांचे प्रमाण देणाऱ्या सुधारित देशी कोंबड्यांची निवड करावी. .आहार व्यवस्थापनपॅरेंट कोंबड्यांना संतुलित आहार देणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा पॅरेंट कोंबड्यांना आवश्यक पोषण घटक पुरेसे न गेल्याने अफलित अंडी तसेच फलित अंड्यातून कमकुवत किंवा मेलेली पिले निघतात. त्यामुळे जीवनसत्त्व ई व सेलेनियम घटकयुक्त असलेले खनिज मिश्रण पॅरेंट कोंबड्यांच्या खाद्यात वापरावे. बुरशीजन्य व काळपट झालेले खाद्य पॅरेंट कोंबड्यांना देऊ नये त्यामुळे फलित अंड्यांचे प्रमाण कमी होऊ शकते..Eating Boiled Eggs : सकाळी नाश्त्याला उकडलेले अंडे खाण्याचे फायदे.आजारांपासून संरक्षणइन्फेक्शिअस ब्राँकाइटीस (IB), एग ड्रॉप सिंड्रोम (EDS), मानमोडी, बर्ड फ्लू, सीआरडी आणि इतर विषाणूजन्य रोगांपासून पॅरेंट कोंबड्यांचे संरक्षण करावे. कारण अशा आजारांमुळे कोंबड्यांची अंडी देण्याची क्षमता कमी होते तर काही आजारामध्ये खराब निकृष्ट दर्जाची अंडी मिळतात. त्यामुळे अशा आजारांवर वेळेत लसीकरण करून घ्यावे. तसेच फार्मवर जैवसुरक्षेचे पालन करावे.अंडी गोळा करणे आणि स्वच्छता कोंबड्यांनी अंडी दिल्यानंतर ती वेळेत गोळा करणे गरजेचे आहे, दिवसातून किमान चार ते पाच वेळा अंडी गोळा करायला हवीत.खराब, विष्टा किंवा रक्त लागलेली अंडी सँडपेपरचा वापर करून स्वच्छ करावी. अशा अंड्यांना ०.१ टक्का अमोनियम क्लोराइड किंवा ०.१ टक्का सोडिअम हायपोक्लोराइडच्या कोमट पाण्याच्या द्रावणात हलक्या हाताने कापडाने स्वच्छ करावे..फलित अंड्यांची हाताळणी फलित अंड्यांना कमीत कमी हाताळणी करणे आवश्यक असते. त्यासाठी अंडी शेडमध्ये स्वच्छ केल्यानंतर चांगल्या ट्रे मध्येच ठेवावीत. त्यानंतर ट्रे अंडी साठवण खोली किंवा अंडी उबवणी खोलीकडे ठेवावेत.फलित अंड्यांची साठवण व्यावसायिक म्हणून फलित अंड्यांची विक्री किंवा पिल्ले काढावयाची असल्यास खालील बाबींची अनुपालन करावे..Eating Boiled Eggs : सकाळी नाश्त्याला उकडलेले अंडे खाण्याचे फायदे.शेडवरून अंडी गोळा करून साफ केल्यानंतर ती अंडी साठवून खोलीत ठेवण्यापूर्वी दूषित किंवा खराब नसावीत. अंडी निर्जंतुकरण करण्याची सोपी व प्रचलित पद्धत म्हणजे धुरळणी (फ्युमिगेशन). त्यासाठी अंडी साठवण खोलीत ठेवण्यापूर्वी अंड्यांचे ४० टक्के फॉरमॅलिन व पोटॅशिअम परमॅग्नेटच्या पावडरने धुरळणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे अंड्याच्या कवचावर असलेले जिवाणू व विषाणू नष्ट होतात. अंड्यांचे फ्युमिगेशन करण्यासाठी प्रमाण ः १०० क्युबिक फूट हवाबंद खोलीसाठी १X तीव्रता ः ४० मिलि फॉरमॅलिन आणि २० ग्रॅम पोटॅशिअम परमॅग्नेट ः २० मिनिटे फलित अंड्यांची साठवण खोली ही हवाबंद असावी. अंड्यांची साठवण किती दिवस करायची आहे त्यानुसार खोलीतील तापमान व आर्द्रता समायोजन केले जाते. .फलित अंड्यांचे ट्रे एकमेकांना चिकटून ठेवू नयेत. तसेच भिंतीला देखील चिकटून ठेवू नये. दोन ओळींमध्ये पुरेसे अंतर तसेच भिंतीपासून देखील पुरेसे अंतर ठेवून अंड्याच्या ट्रेची मांडणी करावी. हवा खेळती राहण्यासाठी असे ठेवणे गरजेचे असते. जास्तीत जास्त ६ ते ७ दिवसांपर्यंत ठेवलेल्या फलित अंड्यातून पिले निघण्याचे प्रमाण जास्त असते. अंडी जितके दिवस साठवून जास्त ठेवू तितके अंडी उबवणीचे प्रमाण कमी होते.साठवण खोली नेहमी स्वच्छ असावी. भिंती आणि जमीन गुळगुळीत असावी.अंडी साठवण खोलीत पहिली आलेली अंडी उबवणुकीसाठी प्रथम बाहेर जातील याची दक्षता घ्यावी..Eggs Nutrition: अंड्याचा पांढरा की पिवळा भाग; तुमच्यासाठी योग्य कोणता? जाणून घ्या!.उबवणुकीसाठी फलित अंड्यांची निवड उबवणुकीसाठी फलित अंडी निवडताना ती स्वच्छ, गुळगुळीत पृष्ठभाग व अंडाकृती आकारात असलेली घ्यावीत. तडा असलेले, पातळ व खडबडीत कवच असलेली अंडी निवडू नयेत. विष्ठा किंवा रक्ताने खराब असलेली तसेच चिरलेली अंडी उबविण्यासाठी निवडू नयेत. कारण अशा अंड्यामुळे मशीनमध्ये ठेवलेली चांगली अंडी दूषित होऊ शकतात. अंडी उबविण्याचे प्रमाण कमी होऊ शकते..व्यवस्थापनातील महत्त्वाचे मुद्दे प्रत्येक २१ दिवसांनंतर पिलांची बॅच गेल्यानंतर इनक्यूबेटर आणि हॅचर या दोन्ही यंत्रांमधील स्वच्छता करून घ्यावी. त्यानंतर फ्युमिगेशनसाठी ३X तीव्रता ः १२० मिलि फॉरमॅलिन आणि ६० ग्रॅम पोटॅशिअम परमॅग्नेट वापरावे. निर्जंतुक औषधाच्या द्रावणाने सर्व स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यावे. यानंतर आपली हॅचरी पुढील बॅचसाठी तयार करावी.अंडी साठवण खोलीतून फलित अंडी काढल्यानंतर लगेच इनक्यूबेटरमध्ये ठेवू नयेत. किमान १२ ते २४ तास अंडी बाहेर सामान्य घरातील तापमानाला ठेवावीत.इनक्यूबेटरच्या ट्रे मध्ये अंडी ठेवताना रुंद टोक वरच्या दिशेने करून अंड्यांची मांडणी करावी.उबवणुकीसाठी अंडी पहिले १८ दिवस इनक्यूबेटरमध्ये ठेवावीत. इनक्यूबेटरचे तापमान ३७.८ अंश सेल्सिअस, आद्रता ५५ ते ५८ टक्के, वायुविजन २१ टक्के ऑक्सिजन आणि ०.५ टक्का कार्बन डायऑक्साइड याप्रमाणे सलग १८ दिवस राखले गेले पाहिजे..Eggs Rate: अंड्याचे दर पोहोचले ६०० रुपये शेकड्यावर.दर २ ते ३ तासांनी अंडी यंत्रणेमध्ये ९० अंशांमध्ये फिरली पाहिजेत. अंडी यंत्रामध्ये फिरत राहिल्याने आतील गर्भ एका बाजूला कुठेही चिकटत नाही. सर्व बाजूने समप्रमाणात तापमान, आद्रता व वायुविजन मिळते. इनक्यूबेटरमधील १८ दिवसांमध्ये दररोज दिवसातून एकदा तरी खराब तसेच फुटलेली अंडी बाहेर काढावीत, त्यामुळे आतील दूषितपणा टाळता येतो. उबवणुकीच्या शेवटच्या ३ दिवसांमध्ये अंड्यातील गर्भाची पूर्ण वाढ होऊन पिलू बाहेर पडण्यासाठी तयार असते. त्यामुळे १८ दिवसांनंतर शेवटचे ३ दिवस अंडी इनक्यूबेटर मधून हॅचरमध्ये स्थलांतरित करावे.हॅचर मशिनमध्ये पिले बाहेर पडण्यासाठी अंडी आडवी ठेवावीत. आतील तापमान ३७.२ अंश सेल्सिअस, आर्द्रता ६५-७० टक्के, वायुवीजन २१ टक्के ऑक्सिजन आणि ०.५ टक्का कार्बन डायऑक्साइड याप्रमाणे सलग ३ दिवस रोखले गेले पाहिजे व या तीन दिवसांत अंडी टर्निंग करण्याची गरज नाही..अंडी उबवणुकीच्या ७ व्या व १८ व्या दिवशी कॅण्डलिंग करून अफलित अंडी बाजूला काढू शकतो.२१ दिवसानंतर तयार झालेले सुदृढ व निरोगी पिल्लांची निवड करून त्यांना पहिल्या दिवसाचे मरेक्स रोगाचे लसीकरण व इतर ताकद वाढविण्याची औषधे देऊन बॉक्समध्ये पॅकिंग करून द्यावीत.व्यवस्थापनाच्या सर्व बाबी व्यवस्थित पार पाडण्यासाठी २४ तास विद्युत पुरवठा असायला हवा, त्यासाठी आपल्या उबवणी केंद्राच्या क्षमतेनुसार विद्युत जनित्राची सुविधा असावी..Eggs Market: अंडी दरात झपाट्याने वाढ, शेकड्याला ५१३ रुपये दर.अंडी उबवणुकीसाठी आवश्यक घटकआवश्यक घटक इनक्यूबेटर(०-१८ दिवस) हॅचर(१९-२१ दिवस)तापमान (अंश सेल्सिअस) ३७.८ ३७.२आर्द्रता (टक्के) ५५-५८ टक्के ६५-७० टक्केअंड्याची मांडणी रुंद टोक वर आडवीटर्निंग हाताने ८ वेळा दिवसातूनस्वयंचलित २४ तास आवश्यक नाही.अंडी उबवणी केंद्राचे व्यवस्थापन अंडी उबवणी म्हणजे अंड्यातून नैसर्गिक किंवा कृत्रिम प्रक्रिया द्वारे पिल्लू बाहेर येणे. नैसर्गिक प्रक्रियेमध्ये कोंबडी खुडूक होऊन आपल्या शरीराच्या खाली २१ दिवस अंडी ठेवून पिले काढते, परंतु व्यावसायिक कुक्कुटपालनात मोठ्या प्रमाणात एकाच वेळी पिले तयार करायची असल्याने या प्रक्रियेत मर्यादा येतात. कृत्रिम प्रक्रियेमध्ये अंडी उबवणी यंत्रामध्ये (हॅचरी) नियंत्रित तापमान, आर्द्रता व हवेच्या प्रवाहाद्वारे अंड्यातील गर्भाची वाढ करून पिले काढली जातात.अलीकडच्या काही वर्षांमध्ये सुधारित देशी कोंबड्यांची अंडी उबवून त्यातून पिले तयार करून १ दिवसाचे, १५ दिवसांचे किंवा १ महिन्याचे पिलू तयार करून विकण्याचा व्यवसाय जोर धरू लागलेला आहे. त्यातून नवनवीन अंडी उबवणी केंद्राची स्थापना होऊ लागली आहे..Eggs vs Paneer: अंडी का पनीर; कशात आहे जास्त प्रोटीन? जाणून घ्या!.अंड्यांच्या उबवणुकीवर परिणाम करणारे घटक अफलीत अंडीउबवणुकीसाठी ठेवण्यात येणाऱ्या अंड्यांमध्ये अफलित अंड्यांचे प्रमाण चांगले राहण्यासाठी पॅरेंट कोंबड्यांचे व्यवस्थापन व्यवस्थित ठेवावे.जुनी अंडी उबवणुकीसाठी ठेवल्यासजास्तीत जास्त ७ दिवसांपर्यंतच्या जुन्या अंड्यातून चांगले पिले मिळू शकतात. .पॅरेंट कोंबड्यांचे व्यवस्थापनआजारी, रोगग्रस्त, कमकुवत व आहारात पोषण तत्त्वांची कमतरता असलेल्या पॅरेंट कोंबड्यांकडून मिळणाऱ्या अंड्यातून कमजोर किंवा कमी प्रमाणात पिले निघतात.खराब कवचाचे अंडे जर उबवणुकीसाठी ठेवण्यात येणारे अंड्यांचे कवच पक्ष्याच्या विष्ठेने, रक्ताने खराब असेल किंवा कमकुवत पातळ कवचाचे असेल तर त्यामुळे इतर अंडी देखील दूषित होतात. उबवणुकीपूर्वी अंड्यांची काळजी अंड्यांची योग्य पद्धतीने काळजी घेतली नसल्यास अंडी उबवणुकीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. यंत्रणेचे व्यवस्थापन यंत्रणेमधील तापमान, आद्रता, वायुविजन, टर्निंग प्रमाणात न राहिल्यास पिल्ले गर्भातच तर काही बाहेर येऊन मरतात. स्वच्छता अंडी उबवणी यंत्रामधील स्वच्छता व निर्जंतुकीकरण वेळोवेळी न केल्यास अंडी उबवणुकीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. .फलित अंड्यांची साठवण खोलीतील तापमान आणि आर्द्रतासाठवणुकीचे दिवस तापमान (अंश सेल्सिअस) आद्रता ( टक्के)०-५ १८-२० ७५५-८ १५-१८ ७५८-१५ १२-१५ ८०१५ च्या पुढे ४-६ ८० - डॉ.अतुल पाटणे ८३०८७८९९४८ (सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन, अकोले, जि. अहिल्यानगर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.