Sugarcane Disease : उसामध्ये ‘चाबूक काणी’ रोग प्रतिकारक्षम जननद्रव्यांची नोंदणी

Sugarcane Cultivation : ‘‘उसावरील ‘चाबूक काणी’ रोगासाठी प्रतिकारक्षम स्रोत म्हणून २०१६ मध्ये ‘कोएम ७६०१’, ‘एमएस ७६०४’ या दोन आणि २०२३ मध्ये ‘कोएम ११०८६’ व ‘कोएम १३०८३’ अशा चार जननद्रव्यांची (जर्मप्लाझम) जननद्रव्य संरक्षण विभागात नोंदणी केली आहे.
Sugarcane Disease
Sugarcane DiseaseAgrowon

Nagar News : ‘‘उसावरील ‘चाबूक काणी’ रोगासाठी प्रतिकारक्षम स्रोत म्हणून २०१६ मध्ये ‘कोएम ७६०१’, ‘एमएस ७६०४’ या दोन आणि २०२३ मध्ये ‘कोएम ११०८६’ व ‘कोएम १३०८३’ अशा चार जननद्रव्यांची (जर्मप्लाझम) जननद्रव्य संरक्षण विभागात नोंदणी केली आहे. अशी नोंदणी करणारे महात्मा फुले हे एकमेव कृषी विद्यापीठ ठरले आहे,’’ असे कुलगुरू डॉ .पी. जी. पाटील यांनी सांगितले.

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे पाडेगाव येथे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र आहे. भारतातील ऊस संशोधनामध्ये काम करणाऱ्या संस्थेपैकी एक अग्रेसर केंद्र म्हणून पाडेगावचा उल्लेख होतो. या केंद्राने आजपर्यंत महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांसाठी अधिक उत्पादन आणि साखर उतारा देणारे १६ पेक्षा जास्त वाण दिले आहेत.

Sugarcane Disease
Sugarcane Disease : उसावर दिसतोय पोक्का बोंग, तांबेराचा प्रादुर्भाव

१०५ पेक्षा जास्त ऊस उत्पादन वाढीसाठी अद्ययावत शिफारशी व तंत्रज्ञान दिले आहे. सध्या महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रापैकी जवळपास ८५ टक्के क्षेत्रावर या संशोधन केंद्राकडून संशोधित वाणांची लागवड व ऊस तंत्रज्ञान शिफारशींचा अवलंब केला जात आहे.’’

‘‘पाडेगाव येथे १९३२ पासून चाबूक काणी रोग प्रतिकारक्षम ऊस वाणांची ओळख, त्याचे मूल्यमापन व संशोधन करण्याचे काम चालू आहे. नवीन व्यावसायिक वाणांची शेतकऱ्यांसाठी शिफारस करण्यापूर्वी त्यांची चाबूक काणी, लाल कुज व मर रोगाससंबंधीची प्रतिकारक क्षमता तपासणे आवश्‍यक असते.

Sugarcane Disease
Sugarcane Disease : ऊसावरील तपकिरी तांबेरा, ठिपक्यांचे नियंत्रण

वाणांमध्ये चाबूक काणी रोग संसर्ग लवकर ओळखण्यासाठी आण्विक आधारित शोधतंत्रासह प्रजनन आणि विविध क्षेत्रीय चाचणी कार्यक्रमांचा अवलंब केला जातो. त्या अनुषंगाने उसावरील चाबूक काणी रोगासाठी प्रतिकारक्षम स्रोत म्हणून चार जननद्रव्यांची (जर्मप्लाझम) नवी दिल्लीच्या राष्ट्रीय वनस्पती आनुवंशिक संसाधन ब्युरो अंतर्गतच्या जननद्रव्य संरक्षण विभागात नोंदणी केली आहे,’’ असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

चाबूक काणी रोगामुळे लागण व खोडवा ऊस पिकाचे उत्पन्न २९ ते ७० टक्क्यांपर्यंत, तर साखर उतारा चार टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता असते. रसाची शुद्धता घटल्यामुळे गुळाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन गुळाची प्रतवारी कमी मिळते. लागवडीखालील ‘को ७४०’ व ‘को ७२१९’ यांसारख्या जास्त उत्पादन व साखर उतारा देणारे उत्कृष्ट वाण चाबूक काणी रोगाला मोठ्या प्रमाणावर बळी पडले. त्यामुळे त्यांचे लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आहे,’’ असेही डॉ. पाटील म्हणाले.

पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने शेतकरी व साखर कारखान्यांच्या प्रगतीकरिता प्रयत्नशील राहून संशोधनातून शेतकऱ्यांसाठी रोग व कीड प्रतिकारक्षम असलेल्या वाणांची निर्मिती करण्यावर भर दिला आहे. संशोधन केंद्रात कार्यरत असलेले ऊस रोग शास्त्रज्ञ व सदरचा जर्मप्लाझम नोंद करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले जात आहेत.
डॉ. राजेंद्र भिलारे, ऊस विशेषज्ञ, पाडेगाव ऊस संशोधन केंद्र

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com