Engineer Farmer Success: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडीये (ता. दोडामार्ग) येथील अनंत नाडकर्णी या अभियंता युवकाने घरची नारळ, काजू, सुपारी, आंबा आदी बागायती शेती समृद्ध केली. सुपारी सोलण्याच्या प्रकिया उद्योगालाही चालना दिली. वर्षाला तीन टन सुपारी उत्पादनासह घरच्या व परिसरातील शेतकऱ्यांकडील मिळून ३५ टन सुपारीवर प्रकिया करीत एकूण शेतीची उलाढाल वाढविली आहे