Solapur University : विद्यापीठात कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरुच

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागण्यांबाबत योग्य ते निर्देश वित्त मंत्रालय व उच्च तंत्र शिक्षण विभागाला दिले होते.
Solapur University
Solapur UniversityAgrowon

Solapur News : येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या (Punyashlok Ahilya Devi Holkar University) कर्मचाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी कामबंद आंदोलन सुरु ठेवले.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री यांच्या सोबत सेवक संयुक्त कृती समितीची बैठक झाली.

या बैठकीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, ५८ महिन्याची थकबाकी, १४१० कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करने, रिक्त जागा भरणे याबाबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागण्यांबाबत योग्य ते निर्देश वित्त मंत्रालय व उच्च तंत्र शिक्षण विभागाला दिले होते.

Solapur University
Cotton Cultivation : महात्मा फुले कृषी विद्यापीठ करणार उन्हाळी कापूस लागवड

परंतु बैठकीत झालेली चर्चा व सेवक कृती समितीकडे प्राप्त इतिवृत्त यामध्ये तफावत असून जोपर्यंत शासन निर्णय निर्गमित होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला. त्यानुसार सलग दुसऱ्या दिवशी देखील काम बंद आंदोलन सुरू राहीले.

आ. प्रणिती शिंदे, रिपाइचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सिनेट सदस्य पद्मजादेवी पाटील, सचिन गायकवाड, डॉ. सुशीलकुमार शिंदे, डॉ. शिरीष शिंदे, प्रा. डॉ. हनुमंत आवताडे, प्राचार्य डॉ. एन. बी. पवार, एम. डी. कमळे आदींनी आंदोलकांची भेट घेऊन प्रश्न समजावून घेतले.

Solapur University
Farmers Hunger Strike : ‘वनामकृवि’ कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण

यावेळी विद्यापीठ कर्मचारी संघटना अध्यक्ष सुनील थोरात, महासंघ उपाध्यक्ष सोमनाथ सोनकांबळे, महासंघ प्रतिनिधी संतोष क्षीरसागर, सरचिटणीस रविकांत हुक्कीरे, उपाध्यक्ष कांचन आघाव, मंगेश कुलकर्णी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्रीशैल देशमुख, राजीव खपाले, चिटणीस दिलीप हाके, उज्वला दंतकाळे, व्यवस्थापन समिती सदस्य जाकीर पठाण, तुकाराम पवार, स्वेता स्वामी, भागवत घंटे, मुख्तार शेख उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com