Grape Crop Management: वाढत्या थंडी, आर्द्रतेमध्ये जैविक नियंत्रणावर द्या भर
Weather Update: उत्तरेकडून महाराष्ट्राकडे येणारे थंड वारे हळूहळू वाढू लागले आहेत. या वाऱ्यांना थांबविणारे पूर्वेच्या समुद्राकडून येणारे वारेही सध्या कमी झाले आहेत. म्हणूनच पुढील काही दिवसांत मध्य भारतातील थंडी व ओघाने महाराष्ट्रातील थंडी वाढण्याची शक्यता दिसते.