Electric Tractor In India
Electric Tractor In IndiaAgrowon

Electric Tractor In India : इंधनावरील ट्रॅक्टरपेक्षा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर परवडते का? इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची किंमत किती असते?

सेलेस्टियल २७ एचपीचा ट्रॅक्टर आहे. ही कंपनी भारतातील आहे. या ट्रॅक्टरची बॅटरी अवघ्या २ तासात चार्ज होते. ब्रेकमध्ये ऑइल इमेरेस्ड ब्रेक देण्यात आले आहेत.

Electric Tractor : बदलत्या काळासोबत शेतीतील तंत्रज्ञानातही बदल होत आहे. कृषी क्षेत्रालाही त्याचा फायदा होतो आहे. कृषी क्षेत्रात मशागती वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या इंधनावर मोठा खर्च करावा लागतो.

शेतकऱ्यांच्या खर्चातही वाढ होते. यावर पर्याय म्हणून इलेक्ट्रिक ट्रॅक्टरकडे शेतकरी वळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची खरेदी करताना कोणते पर्याय उपलब्ध आहेत? याची माहिती पाहूया.

इलेक्ट्रिक ट्रॅक्टर कसे असतात?

इलेक्ट्रिक ट्रॅक्टर इंधनाऐवजी बॅटरीवर चालतो. या ट्रॅक्टरला चार्जिंग केली जाते. त्यासाठी ट्रॅक्टरला चार्ज पॉइंट देण्यात येतो. ट्रॅक्टरमधील बॅटरी चार्ज केली की, त्यावर ट्रॅक्टर चालतो.

चार्ज संपला की, पुन्हा बॅटरी चार्ज केली जाते. किंवा दुसरी बॅटरी जोडून ट्रॅक्टर वापरला जातो. यातून खर्चाची बचत होते. परंतू प्रदूषण टाळता येते.

Electric Tractor In India
Tractor Efficiency: ट्रॅक्टरचा कार्यक्षम वापर वाढवा

एस्कॉर्ट इलेक्ट्रिक ट्रॅक्टर फार्मट्रक, २६ ई-

या ट्रॅक्टरमध्ये ऑटो-स्टेयरिंग, स्मार्ट उपकरणे आणि फवारणी, स्वयंचलित नियंत्रण, अचूक जीपीएस, जिओ-फेंसिंग आणि स्वयंचलित आणि मॅन्यूअल ट्रान्समिशन प्रोग्राम यांचा समावेश यामध्ये आहे. २१ एचपी आणि ३० एचपीचे मॉडेल यामध्ये उपलब्ध आहेत.

या ट्रॅक्टरच्या मदतीने शेतीचे सर्व प्रकारची कामे करता येतात. कंपनीने अजून या ट्रॅक्टरची किंमत जाहीर केलेली नाही. 

सोनालिका टाईगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर-

सोनालिका ही कंपनी ट्रॅक्टर निर्मितीसाठी देशभर प्रसिद्ध आहे. सोनालिकाने ३५ एचपी, आईपी ६७ आणि २५.५ किलोवॅटची कुलिंग बॅटरी या ट्रॅक्टरला जोडण्यात आलेली आहे. घरच्या घरी बॅटरी चार्ज करता येते. फास्ट चार्जिंग पॉइंटमुळे केवळ ४ तासात पूर्णत चार्ज होते.

सोनालिकाच्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमुळे प्रदूषण कमी होते. २४.९३ किलोमीटर प्रतितासाने ट्रॅक्टरची बॅटरी ८ तास चालू शकते. ५ वर्षांत पाच हजार तासांची हमी कंपनी देते. भारतात या ट्रॅक्टरची ५ लाख ९९ हजारांपासून किंमत सुरू होते.

Electric Tractor In India
Tractor Subsidy : शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी मिळाले १३० कोटी रुपये अनुदान

सेलेस्टियल २७ एचपी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर-

सेलेस्टियल २७ एचपीचा ट्रॅक्टर आहे. ही कंपनी भारतातील आहे. या ट्रॅक्टरची बॅटरी अवघ्या २ तासात चार्ज होते. ब्रेकमध्ये ऑइल इमेरेस्ड ब्रेक देण्यात आले आहेत.

ज्यामुळे गतीने नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते. इंधनाची बचत या ट्रॅक्टरमुळे होते. तसेच शेत मशागतीसाठी या ट्रॅक्टरचा वापर करता येतो. लेवलिंग, पेरणी, काढणी आणि आंतरमशागतीसाठी या ट्रॅक्टरची मदत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com