Nashik APMC Election : नाशिक जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरवात

दुसऱ्या टप्यांत लासलगाव आणि मनमाड बाजार समितीसाठी ३० एप्रिलला मतदान अन् त्याच दिवशी मतमोजणी होईल.
Nashik APMC Election
Nashik APMC ElectionAgrowon
Published on: 
Updated on: 

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकीच्या (Market Committee Election) रणधुमाळीस सुरवात होत आहे. एकूण १४ बाजार समित्यांसाठी दोन टप्प्यांत मतदान होत असून, त्यासाठी सोमवार (ता. २७) पासून अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे.

३ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. लांबलेल्या निवडणुका निश्चित झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेसाठी अनेक इच्छुकांनी पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अर्ज घेतले.

जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांसाठी दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया राबवली जात आहे.पहिल्या टप्प्यात २८ एप्रिलला जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, नाशिक, घोटी, येवला,मालेगाव, चांदवड, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी,सिन्नर,नांदगाव या बाजार समित्यांसाठी मतदान होईल.

Nashik APMC Election
Nandurbar APMC Election : तळोदा बाजार समितीच्या सुधारित मतदारयादीमुळे चुरस वाढणार

२९ एप्रिलला मतमोजणी होईल. दुसऱ्या टप्यांत लासलगाव आणि मनमाड बाजार समितीसाठी ३० एप्रिलला मतदान अन् त्याच दिवशी मतमोजणी होईल. दोन टप्प्यांत मतदान होणार असले तरी सर्व बाजार समित्यांसाठीएकाचवेळी २७ मार्चपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे.

२७ मार्च ते ३ एप्रिलदरम्यान अर्ज दाखल करण्यासाठी मुदत असून, ५ एप्रिलला अर्जांची छाननी होईल. छाननीनंतर ६ एप्रिलला उमेदवारी यादी जाहीर केली जाईल. २० एप्रिलपर्यंत माघार घेता येणार आहे. २१ एप्रिल उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्हाचे वाटप होईल.

पॅनल निर्मितीसाठी बैठकांना जोर..

बाजार समित्यांसाठी अर्ज दाखल करण्यास सुरवात होत असताना दुसरीकडे पॅनल निर्मितीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बाजार समिती कार्यक्षेत्रातील नेत्यांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांची गर्दी झाल्याने दिसून येत आहे.

निवडणुकांना सामोरे जाताना जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी तयारीत आहेत. सत्ता आपल्याकडे काबीज करण्यासाठी अनेक डावपेच आखले जात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.