Mumbai News: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या होणाऱ्या निवडणुकीच्या धामधुमीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने ब्रेक लागला आहे. तरीही स्थानिक पातळीवर अंतर्गत घडामोडींना वेग आला असून प्रचारासाठी कमी दिवस मिळत असल्याने धाकधूक वाढली आहे. नगरपंचायत, नगर परिषद, महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवडणुकांचा सपाटा लावणाऱ्या भाजपला ग्रामीण भागात अडथळा निर्माण झाला आहे. .उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली. महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला सहानुभूती मिळण्याची शक्यता असून पक्षाला आता ही निवडणूक नेत्याविना लढावी लागणार आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदांमधील ७३१ जागांसाठी ७६९५ अर्ज दाखल झाले आहेत. तर १२५ पंचायत समित्यांच्या १४६२ जागांसाठी १३ हजार २३ अर्ज दाखल झाले आहेत..Local Body Elections: २४७ उमेदवार निवडणूक रिंगणात .राज्यामध्ये शिवसेनेचा ठाकरे गट अपवादाने निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे चित्र आहे. सत्ताधारी भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विरोधकांची जागा व्यापणे तितकेसे सोपे राहिलेले नाही. अनेक ठिकाणी प्रस्थापितांना आव्हान देण्यासाठी स्थानिक आघाड्यांनी दंड थोपटले आहेत..गेल्या काही वर्षांपासून निवडणुका न झाल्याने बहुतांश ठिकाणी बंडखोरी झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, हातखंबा येथे शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. संगमेश्वरमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्येच लढत होत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत त्यांचे बंधू आमदार किरण सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम असे तगडे नेते असल्याने येथे निवडणुकीत रंगत आली आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेतील माजी खासदार विनायक राऊत आणि आमदार भास्कर जाधव यांच्यातील संघर्षही चव्हाट्यावर येत आहे..Local Body Elections: ६८ जागांसाठी २७१ उमेदवार रिंगणात.सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ५० पैकी आठ आणि पंचायत समितीच्या २७२ पैकी १७ जागा बिनविरोध निवडून आले आहेत. कणकवली विधानसभा मतदारसंघांमध्ये जिल्हा परिषदेच्या १८ पैकी सात जागा बिनविरोध आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेच्या ठाकरे गटाने माघार घेतल्याने बहुतांश निवडी बिनविरोध झाल्या आहेत. येथे भाजप आणि शिवसेनेचा शिंदे गट महायुती म्हणून निवडणूक लढवत आहे. विरोधी पक्षात असलेले शिवसेनेचा ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि विकास आघाडी स्वतंत्र लढत असून नेतृत्वहीन असल्यासारखी अवस्था आहे..सांगली, कोल्हापुरात नेत्यांची परीक्षापश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील नेत्यांची प्रतिष्ठा पणाली लागली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, सांगलीत आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि अन्य नेत्यांची परीक्षा आहे. सांगलीमध्ये बहुतांश लढती तिरंगी होणार असून, काही ठिकाणी महाविकास आघाडी, तर काही ठिकाणी भाजप विरुद्ध संयुक्त राष्ट्रवादी तर काही ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेनेचा शिंदे गट अशी लढत होत आहे. कवठेमहांकाळमध्ये मात्र राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षांमध्ये लढत होत आहे..Local Body Elections: लोहाऱ्यात तब्बल ७३ जणांची माघार.कोल्हापुरात संमिश्र लढतीकोल्हापूर जिल्ह्यामध्ये संमिश्र लढती होत असून, स्थानिक आघाड्यांना बळ मिळाले आहे. पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे विरुद्ध शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सत्यजित पाटील-सरूडकर यांच्या गटामध्ये लढत होत आहे. पन्हाळा तालुक्यातील काही भाग शिवसेनेच्या शिंदे गटाचे चंद्रदीप नरके यांच्या मतदारसंघात येत असल्याने तेथे सरूडकर गटाचे कार्यकर्ते शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. कागलमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध स्थानिक आघाड्या अशी लढत होत आहे. येथे माजी खासदार संजय मंडलिक यांनीही आव्हान दिले आहे. त्यामुळे तिरंगी लढती बरोबरच अपक्ष उमेदवारांचे एकमेकांना आव्हान आहे. आजरा-भुदरगड-राधानगरी या तालुक्यांमध्ये सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आव्हान उभे केले आहे..पुण्यातील गणिते बदलणारपुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपला जोरदार यश मिळाल्याने आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे. भोर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाली होती. तर राजगड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी सरळ लढत आहे. शिरूर तालुक्यात माजी आमदार अशोक पवार यांचे अजित पवार यांच्याशी संबंध जोडल्याने तेथे राष्ट्रवादी काँग्रेसमधील व्यक्त नाराजी व्यक्त केली होती. तेथे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होईल. भोर, शिरूर, जुन्नर, आंबेगाव, खेड, दौंड, इंदापूर, मुळशी आदी ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची लढत भाजप आणि शिवसेनेसोबत होणार आहे..साताऱ्यात भाजप विरुद्ध इतरराष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात भाजपने मुसंडी मारली आहे. त्यामुळे येथे भाजप विरुद्ध शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष अशी लढत होत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि अन्य नेत्यांची येथे प्रतिष्ठा पणाला लागली आहे. फलटण तालुक्यात काही ठिकाणी पंचरंगी, तर काही ठिकाणी दुरंगी लढत होत आहे. बहुतांश ठिकाणी अपक्ष रिंगणात असल्याने दुरंगी तिरंगी लढती होत आहेत..जिल्हा परिषद निवडणुका दोन दिवस लांबणीवरराज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या पाच फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुका दोन दिवस पुढे ढकलण्यात आल्या असून त्या आता ७ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.