Impact of El Nino: अमेरिकेच्या ‘नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन’ (एनओएए)च्या 'क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर' (सीपीसी)ने एल निनोबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे. ‘ईएनएसओ : अलीकडील बदल, सद्यस्थिती आणि भविष्यातील अंदाज’ या ताज्या अहवालानुसार, सध्या सुरू झालेला एल निनो वर्षअखेरीपर्यंत अधिक बळकट होण्याची शक्यता असून, २०२७ च्या मार्चपर्यंत तो कायम राहण्याची तब्बल ९७ टक्के शक्यता व्यक्त करण्यात आली आहे..अहवालानुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ या कालावधीत तीव्र ‘एल निनो’ विकसित होण्याची ८१ टक्के शक्यता आहे. तर अति तीव्र एल निनोऐवजी तुलनेने कमकुवत एल निनो राहण्याची शक्यता सुमारे २० टक्के असल्याचे नमूद करण्यात आले आहे..El Nino Challenges: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतीसमोरील आव्हाने.प्रशांत महासागराच्या तापमानात वाढसीपीसीच्या अहवालानुसार, एल निनोची परिस्थिती आता पूर्णपणे प्रस्थापित झाली आहे. विषुववृत्तीय मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील समुद्रपृष्ठीय तापमान सरासरीपेक्षा जास्त झाले असून, वातावरणातील बदलही एल निनोशी सुसंगत असल्याचे दिसून येत आहे..ऑगस्ट २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील बहुतांश भागात समुद्रपृष्ठीय तापमान सरासरीपेक्षा कमी होते. मात्र, एप्रिल २०२६ च्या मध्यापासून पूर्व-मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे..गेल्या चार आठवड्यांत डेट लाइनपासून पूर्व प्रशांत महासागरापर्यंत समुद्रपृष्ठीय तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले गेले, तर डेट लाईनच्या पश्चिमेकडील भागात तापमान तुलनेने कमी राहिले..El Nino Update : एल निनो मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७ टक्के शक्यता; अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अंदाज.हिंद महासागरही उष्ण, अटलांटिकमध्ये वेगळी स्थितीअहवालानुसार, पूर्व विषुववृत्तीय अटलांटिक महासागरात तापमान सरासरीपेक्षा कमी, तर पश्चिम आणि पूर्व हिंद महासागरात समुद्रपृष्ठीय तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. तसेच, डेट लाइनपासून पूर्व प्रशांत महासागरापर्यंत सकारात्मक तापमान विचलन आणखी बळकट झाले आहे. विषुववृत्ताच्या उत्तरेकडील पूर्व प्रशांत महासागरातही सरासरीपेक्षा जास्त तापमान सातत्याने वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे..समुद्राखालील तापमानात बदल‘एनओएए’च्या अहवालानुसार, २०२५ च्या जुलैपासून डिसेंबरपर्यंत समुद्राखालील तापमान सरासरीपेक्षा कमी होते. त्यानंतर डिसेंबर २०२५ च्या मध्यापासून सकारात्मक तापमान विचलन सुरू झाले आणि एप्रिल २०२६ अखेरपर्यंत त्यात सातत्याने वाढ झाली. एप्रिलच्या अखेरीपासून मेच्या अखेरपर्यंत ही तीव्रता काहीशी कमी झाली होती. मात्र, मे २०२६ च्या अखेरीपासून पुन्हा समुद्राखालील तापमान वाढू लागले असून, गेल्या दोन महिन्यांत विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या बहुतांश भागात समुद्राखालील तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिले आहे..पावसाचे वितरण असमानअहवालात पृथ्वीवरून अवकाशात उत्सर्जित होणाऱ्या दीर्घतरंगीय उष्णता प्रारण (ओएलआर)मधील बदलांचाही उल्लेख करण्यात आला आहे. जून २०२६ पासून इंडोनेशिया परिसरात सकारात्मक ओएलआर विचलन कायम असून, याचा अर्थ त्या भागात ढगनिर्मिती आणि पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे..याउलट, मध्य आणि पूर्व-मध्य विषुववृत्तीय प्रशांत महासागरात नकारात्मक ओएलआर विचलन दिसून आले असून, तेथे ढगनिर्मिती आणि पर्जन्यमान वाढल्याचे संकेत आहेत. या निर्देशांकाच्या आधारे वातावरणातील ढगनिर्मिती आणि पावसाच्या प्रक्रियेचा अंदाज घेतला जातो. एकूणच, ‘एनओएए’च्या ताज्या अहवालानुसार पुढील काही महिन्यांत एल निनोची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगातील अनेक भागांप्रमाणेच भारतातील मॉन्सून, तापमान आणि शेतीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.