Agricultural Universities: हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतीसमोरील आव्हाने वाढत असताना कृषी विद्यापीठांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरत आहे. ‘एल निनो’च्या संकटामुळे मराठवाड्यातील कोरडवाहू शेतीसमोर गंभीर आव्हाने उभी राहिली असून, अशा परिस्थितीत कृषी विद्यापीठांनी दिशादर्शक कामकाज करणे आवश्यक आहे. प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले पाहिजे, असे प्रतिपादन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले..वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभागातर्फे सोमवारी (ता. १८) आयोजित खरीप पीक परिसंवादाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते दूरदृश्यप्रणालीद्वारे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा होते. यावेळी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉ. पंजाबसिंग, महापौर सय्यद इक्बाल, माजी खासदार सुरेश जाधव, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण, प्रभारी कुलसचिव पी. के. काळे, प्रभारी नियंत्रक अनंत कदम, विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते..Climate Change Farming: बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी यांत्रिकीकरण गरजेचे : जिल्हाधिकारी कर्डिले .कृषिमंत्री भरणे म्हणाले, की राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतून हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची दूरदृष्टी दिसून येते. परभणी कृषी विद्यापीठाचा ‘माझा एक दिवस माझ्या बळिराजासाठी’ हा अभिनव उपक्रम कौतुकास्पद आहे. ड्रोन तंत्रज्ञान, कीड व रोगांचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर तसेच महाविस्तार यांसारख्या तंत्रज्ञानातील विद्यापीठाची कामगिरी महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले..Climate Change Farming: हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीसाठी आत्मसात करणे आवश्यक.ते पुढे म्हणाले, की शेतकऱ्यांनी पाणी व्यवस्थापन, पीक वैविध्यीकरण आणि डिजिटल साधनांचा स्वीकार करणे गरजेचे आहे. नैसर्गिक संकटांसोबतच शेतीमालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. डॉ. पंजाबसिंग म्हणाले, की कमी उत्पन्नामुळे अनेक शेतकरी अद्याप आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. .कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले तंत्रज्ञान त्यांच्या बांधापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा म्हणाले, की परभणी येथे १९१८ पासून देशी कापूस संशोधन केंद्र कार्यरत आहे. तसेच ५४ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या कृषी विद्यापीठाच्या जडणघडणीत अनेक कुलगुरू आणि शास्त्रज्ञांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. मागील चार वर्षांत प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्यात आले असून चार नवीन महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. कमी मनुष्यबळावर कामकाज करत विद्यापीठाने ‘अ’ श्रेणी मानांकन प्राप्त केले असल्याचे त्यांनी सांगितले. तांत्रिक सत्रात विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एल निनोच्या पार्श्वभूमीवरील पीक व्यवस्थापन तसेच विविध खरीप पिकांच्या लागवड व व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले..जूनपूर्वी कर्जमाफी योजना लागू : भरणेभरणे म्हणाले, की ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जूनपूर्वी लागू करण्यात येईल. या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.