Agriculture Department: पॅसिफिक महासागरातील तापमानवाढीमुळे निर्माण होणाऱ्या एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनवर विपरीत परिणाम होऊन दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आगाऊ नियोजन करत शाश्वत पीक व्यवस्थापनाच्या उपाययोजना अवलंबून या नैसर्गिक संकटावर मात करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार यांनी केले आहे..लांजेवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एल निनोमुळे मान्सूनचा वेग आणि स्वरूप बदलून पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. परिणामी खरीप पेरण्या लांबणे, पिकांवर पाण्याचा ताण येणे, जलसाठ्यांमध्ये घट होणे आणि जनावरांसाठी चारा टंचाई निर्माण होण्याचा धोका वाढतो. कमी पावसामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होऊन पिके सुकण्याची शक्यता असते. .Kharif Agriculture Planning: खते-बियाण्यांचा पुरेसा पुरवठा करा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार.तसेच सिंचनासाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता घटल्याने उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. यामुळे शेतकऱ्यांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन पीक नियोजन करणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे..Agriculture Planning: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार.एल निनोच्या संभाव्य परिणामांना सामोरे जाण्यासाठी पुरेसा ओलावा झाल्यानंतरच पेरणी करावी, कमी कालावधीत येणाऱ्या आणि कमी पाण्याची गरज असलेल्या वाणांची निवड करावी, असा सल्ला लांजेवार यांनी दिला आहे. भाजीपाला व फळबागांमध्ये तुषार किंवा ठिबक सिंचनाचा वापर वाढविणे, पिकांच्या अवशेषांचे अथवा प्लास्टिक मल्चिंगचे आच्छादन करणे आणि सेंद्रिय खतांचा वापर करून जमिनीची जलधारण क्षमता वाढविण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली..दीर्घ पावसाच्या खंडामुळे लष्करी अळी व रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी नियमित पीक निरीक्षण करावे. आवश्यकतेनुसार महाविस्तार एआय ॲपच्या माध्यमातून कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच संभाव्य नुकसानापासून संरक्षणासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.